देवळा नगराध्यक्षपदी भाजपच्या भारती आहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 15:57 IST2022-02-15T15:55:43+5:302022-02-15T15:57:06+5:30
नगराध्यक्षपदासाठी भारती आहेर यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे देशमुख यांनी भारती आहेर यांची नगराध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाल्याने घोषित केले.

देवळा नगराध्यक्षपदी भाजपच्या भारती आहेर
नाशिक- देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज सकाळी ११ वाजता नगरपंचायतीच्या सभागृहात चांदवडचे उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नूतन नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी भारती आहेर यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे देशमुख यांनी भारती आहेर यांची नगराध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाल्याने घोषित केले.
नगरसेवक भाग्यश्री पवार यांनी जितेंद्र आहेर यांच्या नावाची सुचना आणली असता, करण आहेर यांनी त्यास अनुमोदन दिले व जितेंद्र आहेर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी भाजपाचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.