‘भाजपा हटाव, संविधान बचाओ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:20 IST2018-10-29T00:19:33+5:302018-10-29T00:20:35+5:30
‘भाजपा हटाव, संविधान बचाओ’ अशा घोषणा देत कॉँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले.

‘भाजपा हटाव, संविधान बचाओ’
नाशिक : ‘भाजपा हटाव, संविधान बचाओ’ अशा घोषणा देत कॉँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. भाजपा सरकारच्या कार्यकाळात देशाची हानी झाली. जातीयवाद उफाळून आणला गेला तसेच अर्थव्यवस्था कोलमडून पडल्याचा आरोप करत कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष हनीफ शेख यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन रविवारी (दि.२८) करण्यात आले. विविध प्रकारचे घोटाळे करत जनतेला आश्वासनांची खैरात करून फडणवीस व मोदी सरकारने दिशाभूल केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या धरणे आंदोलनात जावेद पठाण, मुसा कुरेशी, नगरसेवक आशा तडवी, रईस शेख, बाबर खान, नुरिया खैरू न्निसा, हिना शेख आदी उपस्थित होते.