भाजपाच मुख्यमंत्री होणार; भाजपा सरचिटणीस सरोज पांडे यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 20:00 IST2019-07-15T19:41:50+5:302019-07-15T20:00:02+5:30

नाशिक- भाजपा शिवसेनेचा जागा वाटपाचा काय फॉर्मुला ठरला ते माहिती नाही, परंतु सर्वाधिक आमदार भाजपाचेच निवडून येतील तसेच कोणाचा काहीही कल्पना विलास असो, मुख्यमंत्री भाजपाचाच होईल असे भाजपाच्या राष्टÑीय सरचिटणीस आणि महाराष्टÑाच्या प्रभारी सरोज पांडे यांनी सोमवारी (दि.१५) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

BJP will be chief minister; BJP general secretary Saroj Pandey's claim | भाजपाच मुख्यमंत्री होणार; भाजपा सरचिटणीस सरोज पांडे यांचा दावा

भाजपाच मुख्यमंत्री होणार; भाजपा सरचिटणीस सरोज पांडे यांचा दावा

ठळक मुद्देकल्पना विलास करून उपयोग नाही, सेनेला टोलाकर्नाटकात भाजपाचे डर्टी पॉलिटीक्स नाही

नाशिक-भाजपा शिवसेनेचा जागा वाटपाचा काय फॉर्मुला ठरला ते माहिती नाही, परंतु सर्वाधिक आमदार भाजपाचेच निवडून येतील तसेच कोणाचा काहीही कल्पना विलास असो, मुख्यमंत्री भाजपाचाच होईल असे भाजपाच्या राष्टÑीय सरचिटणीस आणि महाराष्टÑाच्या प्रभारी सरोज पांडे यांनी सोमवारी (दि.१५) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

आगामी विधान सभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सरोज पांडे यांनी नाशिकमध्ये येऊन संघटनात्मक कामांचा आढावा घेतला. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. भाजपा हा देशात अत्यंत मजबुत पक्ष झाला आहे. अनेक पक्षातून लोक भाजपात येण्यास तयार आहेत. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांच्यावर लोकांचा विश्वास आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की , शिवसेनेबरोबर भाजपाची युती आहेच. मात्र कोणीही कल्पना विलास केला तरी मुख्यमंत्री भाजपाचाच होणार हे स्पष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

कर्नाटकातील सत्तांतर नाट्यावरून बोलताना त्यांनी भाजपाच डर्टी पॉलीटिक्स करीत नाही. असे सांगतानाच ज्यांना आपले आमदार सांभाळता येत नाही त्यांना कॉँग्रेसला आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही सांगितले
विरोधकांना टोमण मारताना त्यांनी लोकशाहीत विरोधी पक्ष हा मजबुतच असायला हवा, मात्र देशात आणि राज्यात विरोधी पक्ष निष्प्रभ असून जे नवं नेतृत्त्व शोधत आहेत, त्यांनी ते लवकर शोधावे यासाठी शुभेच्छा आहेत. असेही त्या म्हणाल्या.

Web Title: BJP will be chief minister; BJP general secretary Saroj Pandey's claim