भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:01 IST2020-05-19T21:42:58+5:302020-05-20T00:01:11+5:30
संपूर्ण देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून याला महाआघाडी सरकारचा नाकर्तेपणा, दिशाहीन नेतृत्व, प्रशासनावर अंकुश नसल्याचा अभाव जबाबदार असून, केंद्र सरकारने आखून दिलेल्या उपाययोजना करण्यात राज्य शासन पूर्णत: अपयशी ठरले आहे. या निषेधार्थ भाजपच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कळवण तालुका भाजपच्या वतीने नायब तहसीलदार व्यंकटेश गुप्ते यांना तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांच्या नेतृत्वाखाल शिष्टमंडळाने निवेदन दिले.

कळवण येथे नायब तहसीलदार व्यंकटेश गुप्ते यांना फिजिकल डिस्टन्स ठेवून निवेदन देताना दीपक खैरनार, विकास देशमुख, निंबा पगार, विश्वास पाटील, एस.के पगार, हेमंत रावले, यतिन पवार, मोतीराम वाघ, चेतन निकम आदी.
कळवण : संपूर्ण देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून याला महाआघाडी सरकारचा नाकर्तेपणा, दिशाहीन नेतृत्व, प्रशासनावर अंकुश नसल्याचा अभाव जबाबदार असून, केंद्र सरकारने आखून दिलेल्या उपाययोजना करण्यात राज्य शासन पूर्णत: अपयशी ठरले आहे. या निषेधार्थ भाजपच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कळवण तालुका भाजपच्या वतीने नायब तहसीलदार व्यंकटेश गुप्ते यांना तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांच्या नेतृत्वाखाल शिष्टमंडळाने निवेदन दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गारपिटीमुळे शेतकरीवर्गाचे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई मिळावी. तालुक्यातील बरेचसे कर्मचारी मालेगाव येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. त्यांची विलगीकरण केंद्राची सुविधेसह व्यवस्था करावी. कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा नाफेडमार्फत योग्य दरात खरेदी करावा व मका खरेदी ई- केंद्रामार्फत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, शहराध्यक्ष निंबा पगार, सरचिटणीस विश्वास पाटील, एस. के पगार, तालुका उपाध्यक्ष हेमंत रावले, यतिन पवार, मोतीराम वाघ, रवंींद्र पवार युवा मोर्चा शहराध्यक्ष चेतन निकम, बगडूचे उपसरपंच गोरख पवार, काशिनाथ गुंजाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.