भाजपतर्फे दिंडोरी तहसिलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 03:58 PM2020-06-24T15:58:38+5:302020-06-24T16:02:25+5:30

दिंडोरी : भारतीय जनता पार्टी दिंडोरी तालुक्याच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार कैलास पवार यांना देण्यार आले.

BJP statement to Dindori tehsildar | भाजपतर्फे दिंडोरी तहसिलदारांना निवेदन

दिंडोरीचे तहसीलदार कैलास पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना भाजपचे नरेंद्र जाधव समवेत चंद्रकांत राजे, विवेक कुलकर्णी, प्रमोद देशमुख, तुषार वाघमारे आदी.

Next
ठळक मुद्देशेतकरी बांधवांचा प्रश्न मांडणारे निवेदन सादर केले.

दिंडोरी : भारतीय जनता पार्टी दिंडोरी तालुक्याच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार कैलास पवार यांना देण्यार आले.
तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, जेष्ठ नेते चंद्रकांत राजे, विवेक कुलकर्णी, गटनेते प्रमोद देशमुख, नगरसेवक व तालुका सरचिटणीस तुषार वाघमारे, योगेश तिडके, शहराध्यक्ष शामराव मुरकुटे, नगरसेवक निलेश गायकवाड, दत्तात्रय जाधव, काकासाहेब देशमुख, सतिश पाटील, कचरु शिंदे, किरण नाईक, सतिश जाधव आदींनी तहसिलदार कैलास पवार यांना संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांचा प्रश्न मांडणारे निवेदन सादर केले.
याप्रसंगी सर्व शासकिय नियमांचे पालन करु न सोशल डिस्टंसिंग पाळून ठराविक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तसेच दिंडोरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना राष्ट्रीयकृत बँकांतर्फे पिककर्ज तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणे गरजेचे आहे. संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना पावसाच्या आगमनापुर्वी पिककर्ज तात्काळ उपलब्ध करावे तसेच सरकारने दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीच्या शब्दास जागून सर्व शेतकरी बांधवांचा ७/१२ कोरा करावा आदी मागण्या करण्यात आल्या.
सदर निवेदन सादर केल्यानंतर सर्व पदाधिकाºयांनी एक मिनिट मौन पाळून भारतमातेच्या इंच इंच जमीनीच्या रक्षणासाठी बलिदान देणाºया वीर गवानांना आदरांजली वाहण्यात आली.
 

Web Title: BJP statement to Dindori tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.