शहराध्यक्ष निवडीसाठी भाजपची आज बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 00:57 IST2020-01-05T00:57:07+5:302020-01-05T00:57:28+5:30
नाशिक : भाजपच्या शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त लागला असून, बहुतांशी मंडल अध्यक्ष निवडले गेल्यानंतर आता रविवारी (दि.५) नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यासाठी अहमदनगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडे डझनभर इच्छुक असले तरी विद्यमान अध्यक्ष गिरीश पालवे यांची फेरनिवड होण्याची शक्यता अधिक आहे. तथापि, पक्ष धक्कातंत्राचा वापर करून अन्य चेहऱ्यालादेखील संधी देऊ शकतो.

शहराध्यक्ष निवडीसाठी भाजपची आज बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क,
नाशिक : भाजपच्या शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त लागला असून, बहुतांशी मंडल अध्यक्ष निवडले गेल्यानंतर आता रविवारी (दि.५) नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यासाठी अहमदनगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडे डझनभर इच्छुक असले तरी विद्यमान अध्यक्ष गिरीश पालवे यांची फेरनिवड होण्याची शक्यता अधिक आहे. तथापि, पक्ष धक्कातंत्राचा वापर करून अन्य चेहऱ्यालादेखील संधी देऊ शकतो.
भाजपने राज्यातील संघटनात्मक निवडणुकीसाठंी १० जानेवारी ही मुदत दिली आहे. नाशिक भाजपच्या संघटनात्मक निवडणुका विलंबाने सुरू झाल्या. त्यातच मंडलांची संख्या वाढवून दहा करण्यात आली. त्यानंतर आता शहराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. माजी खासदार दिलीप गांधी यांच्या बरोबरच उत्तर महाराष्टÑ संघटन मंत्री किशोर काळकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष निवड
९ जानेवारीस?
शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नाशिक शहरापाठोपाठ ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची निवडणूकदेखील घेण्यात येणार असून, येत्या ९ जानेवारीला निवडणूक होण्याची शक्यता आहे. मावळते जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी दोन टर्म पूर्ण केल्याने त्यांना आता संधी मिळण्याची शक्यता नाही. त्यांच्या जागी बापू पाटील, सोनवणे यांच्यासह अन्य इच्छुक आहेत. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी नंदुरबारचे डॉ. शशिकांत वाणी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.