भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधी उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा मग केली टीका

By संजय पाठक | Updated: July 27, 2023 17:08 IST2023-07-27T17:07:53+5:302023-07-27T17:08:57+5:30

नाशिकमध्ये शेतकरी मेळाव्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आयुष्य मंगलमय होवो अशा शुभेच्छा दिल्या. त्यानंतर टीका केली.

BJP leader Chandrashekhar Bawankule first congratulated Uddhav Thackeray and then criticized him | भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधी उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा मग केली टीका

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधी उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा मग केली टीका

नाशिक- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा प्रकाराच्या शुभेच्छा दिल्यानंतर मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना
स्मृतीभंशाचा आजार झाला आहे, आधी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करत होते आणि आज वाढदिवसाच्या दिवशी मोदींसारख्या विश्वगुरूंवर टीका करीत आहेत,असे ते म्हणाले.

नाशिकमध्ये शेतकरी मेळाव्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आयुष्य मंगलमय होवो अशा शुभेच्छा दिल्या. त्यानंतर टीका केली. बाळासाहेब ठाकरे हे मोठे हिंदुत्ववादी नेते होते, मात्र, सुपूत्र हिंदू विरोधी होईल आणि सत्तेची फळे चाखण्यासाठी हिंदुत्व तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार सोडतील असे वाटले नव्हते असे सांगून उध्दव ठाकरे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला असे ते म्हणाले.

Web Title: BJP leader Chandrashekhar Bawankule first congratulated Uddhav Thackeray and then criticized him