शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

"आगामी निवडणुकांमध्ये भाजप हाच आमचा मुख्य शत्रू"; नाना पटोलेंचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 15:57 IST

इगतपुरी : आगामी निवडणुकांमध्ये भाजप हाच आमचा मुख्य शत्रू राहणार आहे. त्यानुसार आमची भूमिका राहणार आहे. महापालिका निवडणुकांमध्ये सत्तेची ...

इगतपुरी : आगामी निवडणुकांमध्ये भाजप हाच आमचा मुख्य शत्रू राहणार आहे. त्यानुसार आमची भूमिका राहणार आहे. महापालिका निवडणुकांमध्ये सत्तेची सूत्र काँग्रेसकडेच राहतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिर सांगताप्रसंगी सांगितले. दरम्यान, पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर जोरदार टीका केली व गावगुंडांना गावगुंडच दिसणार असल्याचा टोला माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला.

इगतपुरीत रेन फॉरेस्ट रिसोर्ट येथे मुंबई प्रदेश काँग्रेसच्यावतीने आयोजित तीनदिवसीय प्रशिक्षण शिबिराची सांगता रविवारी (दि. २३) झाली. यावेळी नाना पटोले यांनी मार्गदर्शन करत पक्षाची भूमिका विषद केली. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी सांगितले, मोदी सरकारने जनतेचे मूळ मुद्दे बाजूला सारल्याने देशात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. महागाईमुळे लोकांचे जगणे मुश्कील झाले असून, केंद्रातील सरकार सपशेल फेल झाले आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस चांगली कामगिरी करेल.

भाजप व शिवसेनेची गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता राहिली आहे. मात्र, आगामी निवडणुकीत भाजप हाच आमचा मुख्य शत्रू राहणार आहे. त्या पद्धतीने आम्ही भूमिका ठरवू. महाराष्ट्राची ओळख ही बाळासाहेब ठाकरेंमुळे झाली आहे. म्हणून मी त्यांच्या प्रत्येक जयंतीदिनी अभिवादन करतो. राजकारण हे परिवर्तनवादी असते, बाळासाहेबांना धोकेबाज लोक कधीच आवडत नव्हते आणि ज्यांनी त्यांच्याशी धोका केला ते त्यांना जवळही उभे करत नव्हते. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, आमदार हिरामण खोसकर, संदीप गुळवे, तालुकाध्यक्ष रमेश जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळ लहांगे आदी उपस्थित होते.

...तर शेतकऱ्यांची वीजजोडणी चालू ठेवू

ऊर्जामंत्री नितीन राऊत हे शेतकऱ्याची वीज कापल्याशिवाय पर्याय नाही, असे बोलले असता यावर भाजपने टीका केली. मात्र, २०१७पासून भाजपने केलेले पाप आमच्या शेतकऱ्यांच्या उरावर आहे. भाजपच्या काळात जे नुकसान झाले त्याचे परिणाम शेतकरी भोगतोय. मात्र, विधानसभेत याविषयी चर्चा झाली असून, फक्त चालू बिले भरली तरी शेतकऱ्यांचे कनेक्शन कायम चालू ठेवण्याचा निर्णय झाला असल्याची माहितीही पटोले यांनी दिली.

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण