शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस ताब्यात राखणार की भाजपा खेचणार

By admin | Updated: January 14, 2017 00:31 IST

पदवीधर मतदारसंघ : राजकीय समीकरणे बदलल्याने दुहेरी लढतीचे संकेत

नाशिक : राज्यात कॉँग्रेसची सत्ता असतानाही पदवीधर मतदारसंघावर वर्चस्व ठेवून असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून सात वर्षांपूर्वी कॉँग्रेसने हा मतदारसंघ खेचून आणला असला तरी, राज्यात व केंद्रात झालेल्या सत्तांतरानंतर होत असलेल्या या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस व भाजपा या दोनच पक्षांमध्ये पुन्हा लढत होण्याचे संकेत आहे.
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात झाली असून, या निवडणुकीसाठी कॉँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे, भारतीय जनता पक्षाने डॉ. प्रशांत पाटील तर तिसऱ्या आघाडीने कॉ. राजू देसले यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघावर म्हणजेच २००९ पर्यंत भारतीय जनता पक्षाचेच वर्चस्व राहिले. ना. स. फरांदे यांनी अनेक वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले, त्यानंतर १९९८ मध्ये फरांदे यांच्याऐवजी भाजपाने प्रतापदादा सोनवणे यांना उमेदवारी दिली. सलग दोन वेळा सोनवणे या मतदारसंघातून निवडून आले, मात्र त्यांना २००९ मध्ये त्यांना खासदारकी लाभल्याने पदवीधर मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागली. अवघ्या वर्षभराचा कालावधी शिल्लक असताना झालेल्या या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत झाली, त्यात भाजपाकडून प्रसाद हिरे, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे अ‍ॅड. नितीन ठाकरे रिंगणात होते. यांच्या लढतीत अपक्ष डॉ. सुधीर तांबे यांनी विजय मिळवत अल्पकाळासाठी का होईना या मतदारसंघात परिवर्तन घडवून आणले. त्यानंतर वर्षभरात म्हणजे २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत राजकीय गणिते बदलली. डॉ. सुधीर तांबे यांना दोन्ही कॉँग्रेसने उमेदवारी दिली व भाजपाने प्रा. सुहास फरांदे यांना रिंगणात उतरविले. सरळ सरळ दुरंगी झालेल्या या निवडणुकीत तांबे यांनी पुन्हा बाजी मारून मतदारसंघावर कब्जा मिळविला व भाजपाला दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. या सर्व परिस्थितीला सहा वर्षांचा कालावधी लोटला असून, या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. केंद्रात व राज्यात सत्तांतर घडले, मतदारांवर मोदी नावाचे गारुड घट्ट बसले तर ताकदवान समजल्या जाणाऱ्या कॉँग्रेसची ताकद क्षीण झाली. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा या मतदारसंघातील अडीच लाख मतदार सामोरे जाऊ पहात असताना बदललेल्या राजकीय समीकरणांपासून ही निवडणूकही दूर राहू शकत नाही. कॉँग्रेस व राष्ट्रवादीत सत्ता काबीज करण्यासाठी सुरू असलेली चढाओढ पाहता, राष्ट्रवादीनेही या निवडणुकीत उतरण्याची कॉँग्रेसला मध्यंतरी धमकी दिली तशीच आजमावणी शिवसेनेनेही करून पाहिली. अर्थातच राष्ट्रवादी असो की शिवसेना या दोघांना ही निवडणूक लढविण्यापेक्षा मित्रपक्षांना जेरीस आणणे हाच एकमेव हेतू आहे हे लपून राहिलेले नाही. कारण दोन महिने या मतदारसंघासाठी मतदारांची नोंदणी सुरू असताना या दोन्ही पक्षांनी त्यासाठी दाखविलेली उदासीनता बरेच काही सांगून गेली. (प्रतिनिधी)