राज्यातील मंदिरं खुली करा; भाजपाचं नाशकात घंटानाद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 14:43 IST2020-08-29T14:41:51+5:302020-08-29T14:43:44+5:30

रामकुंड परिसरात पाण्यात उतरून भाजप कार्यकर्त्यांचा घंटानाद; मंदिरं खुली करण्यासाठी घोषणाबाजी

bjp demands opening of temples does ghantanad andolan | राज्यातील मंदिरं खुली करा; भाजपाचं नाशकात घंटानाद आंदोलन

राज्यातील मंदिरं खुली करा; भाजपाचं नाशकात घंटानाद आंदोलन

नाशिक: राज्यातील सर्व मंदिरं सुरू करावीत या मागणीसाठी भाजप आणि विविध धार्मिक संघटनांच्या वतीने आज नाशिकमध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहरातील रामकुंड परिसरात पाण्यात उतरून घंटानाद करतानाच कार्यकर्त्यांनी मंदिरे खुली करण्यासाठी घोषणा दिल्या तसेच कपालेश्वर मंदिरातही घंटानाद करण्यात आला. 

केंद्र सरकारने मंदिर खुली करण्यासाठी 4 जून रोजी अध्यादेश काढून देखील राज्य सरकार मंदिरे सुरू करण्यास टाळाटाळ करत आहे. त्याचा निषेध या वेळी करण्यात आला. या आंदोलनात भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले तसेच पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, विश्व हिंदू परिषद, वारकरी महामंडळ, हिंदू एकता आंदोलन, बजरंग दल तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
 

Web Title: bjp demands opening of temples does ghantanad andolan