बड्या नेत्यांनी उदासिनता दाखवल्यानेच भाजपचा पोटनिवडणूकीत पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:23 AM2020-01-12T00:23:06+5:302020-01-12T00:28:12+5:30

तीन वर्षांपूर्वी शहरात भाजपची इतकी लाट होती की तीन आमदारांबरोबरच भाजपने महापालिकेत विक्रमी बहुमत मिळवले होते. मात्र, विधानसभा निवडणूकीतील राज्यातील अपयशाचा फटका सर्वत्र बसु लागला आहे. नाशिक महापालिकेच्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीने एकसंघपणे काम केल्याने त्यांना यश मिळाले असले तरी भाजपचा नाकर्तेपणाही तितकाच कारणीभूत आहे. या निवडणूकीला स्थानिक आणि वरीष्ठ पातळीवर फार महत्व दिले गेले नाही. त्यातूनच हा पराभव झाल्याचे दिसत आहे.

BJP defeats by-election only because of big leaders showing indifference | बड्या नेत्यांनी उदासिनता दाखवल्यानेच भाजपचा पोटनिवडणूकीत पराभव

बड्या नेत्यांनी उदासिनता दाखवल्यानेच भाजपचा पोटनिवडणूकीत पराभव

Next
ठळक मुद्देपोटनिवडणूकीचा कौलमहाविकास आघाडीची सरशी

संजय पाठक, नाशिक- तीन वर्षांपूर्वी शहरात भाजपची इतकी लाट होती की तीन आमदारांबरोबरच भाजपने महापालिकेत विक्रमी बहुमत मिळवले होते. मात्र, विधानसभा निवडणूकीतील राज्यातील अपयशाचा फटका सर्वत्र बसु लागला आहे. नाशिक महापालिकेच्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीने एकसंघपणे काम केल्याने त्यांना यश मिळाले असले तरी भाजपचा नाकर्तेपणाही तितकाच कारणीभूत आहे. या निवडणूकीला स्थानिक आणि वरीष्ठ पातळीवर फार महत्व दिले गेले नाही. त्यातूनच हा पराभव झाल्याचे दिसत आहे.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ आणि २६ मध्ये झालेल्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचे जगदीश पवार आणि मधूकर जाधव निवडून आले आहेत. जगदीश पवार हे राष्टÑवादीचे तर मधूकर जाधव हे शिवसेनेचे आहेत. प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपच्या सरोज आहिरे यापूर्वी नगरसेविका होत्या. विधानसभा निवडणूक भाजपकडून इच्छुक होत्या. परंतु शिवसेना- भाजप युती झाल्याने त्यांची अडचण झाली. राष्टÑवादीकडून त्या निवडणूक लढल्या आणि विजयी झाल्या. सहाजिकच त्यांच्या जागी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणणे हे त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे होते. जगदीश पवार निवडून आल्याने ही प्रतिष्ठा राखली गेली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत प्रभाग क्रमांक २६ मधील शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी राजीनामा दिला आणि मनसेकडून विधान सभा निवडणूक लढविली होती. त्यात पराभव झाल्याने पुन्हा त्यांनी नगरसेवकपदाकडे लक्ष दिले परंतु यंदा त्यांना मतदारांनी साथ नाकरल्याने बाबा गेल्या आणि दशम्याही अशी त्यांची अवस्था झाली.

मधूकर जाधव तसे राष्ट्रवादीचे ! ते शिवसेनेकडून निवडणूक लढले तर जगदीश पवार यांना भाजपातील बंडखोरीची साथ लाभली. रामदास सदाफुले या बंडखोराचा विजय झाला तर नाहीच परंतु भाजपच्या डॉ. विशाखा शिरसाट यांना पराभूत करण्यात मात्र ते यशस्वी ठरले. हा सर्व खेळ सुरू असताना भाजपकडून अत्यंत निराशाजनक वातावरण होते. राज्यात सत्ता असताना येणारे कोणी नेते नाशिककडे फिरकले नाही. यापूर्वीच्या महापालिका निवडणूकीत तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष घातले होते. मात्र, त्यावेळी आपल्या मुळेच पक्षाची सत्ता आली असा भ्रम असणारे अन्य स्थानिक नेते होते. यंदा महाजन यांनी लक्ष काढून घेतल्यानंतर त्यांना देखील आपली किंमत कळाली. मुळातच विधान सभा निवडणूकीपासून भाजपतील गटबाजी अंतिम टप्प्यात पोहोचू लागली आहे. महापौरपद हुकल्यानंतर अनेक आयाराम आता परतीच्या मार्गावर लागले आहेत. ते पक्षात असल्याने बाजुल्या पडलेल्या मुळ भाजप नेत्यांनी यानिवडणूकीत लक्ष घातले नाही आणि आयाराम असलेल्यांनी तर आता सर्वच गोष्टीतून अंग काढून घेतले आहे. त्याचा साराच परीणाम या निवडणुकीवर जाणवला.

पक्षीय बळ घटल्याने आता महापालिकेच्या हातातून स्थायी समिती जाईल अशी चर्चा आहे. ते खरे होईल किंवा नाही हे दिसेलच परंतु पडझड झालीच तर ते सावरणे कठीण होईल. त्यासाठी आताच तटबंदी केली नाही तर दोन वर्षांनी होणारी महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक कठीण जाणार आहे.

 

Web Title: BJP defeats by-election only because of big leaders showing indifference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.