शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा प्रवेश सोहळ्यावर ‘संक्रांत’

By admin | Updated: December 25, 2015 23:43 IST

दानवेंचा दौरा रद्द : मनसेला मिळाला दिलासा; नेत्यांच्या आकांक्षांना बसला ब्रेक

नाशिक : मनसे फोडून भाजपात प्रवेश करवून घेण्याच्या काही नेत्यांच्या आकांक्षांना ब्रेक बसला आहे. रविवारी येणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा दौरा स्थगित झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून, त्यामुळे मनसेच्या स्थानिक नेत्यांना दिलासा मिळाला आहे.मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार वसंत गिते यांनी आपल्या काही निवडक सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला. त्यानंतर मनसेच्या काही नगरसेवकांनी त्याचे अनुकरण केले असले तरी सध्या नगरसेवक पद असल्याने आणि काहींकडे पद असल्याने त्यांनी प्रवेश टाळला होता. २०१७ मध्ये होत असलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेत मोठी फूट पडणार असल्याची चर्चा असून, या फुटीर नगरसेवक भाजपाच्या गळास सहज लागतील अशी अटकळ बांधली जात असताना अन्य सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेनेदेखील तशी तयारी केली आहे. दुसरीकडे अनेक मोठे नेते पक्षातून गेल्याने मनसेच्या स्थानिक नेतृत्वावर डॅमेज कंट्रोलचे मोठे आव्हान उभे होते. त्यातून स्थानिक नेतृत्वाची कसोटी लागणार होती. मनसेच्या असंतुष्ट आणि पक्षातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांंना आश्वासने आणि आमिषे देऊन रोखण्याचा प्रयत्न सुरू होता. इतकेच नव्हे तर पक्षाचे शहर संपर्क अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी तातडीने नाशिकमध्ये येऊन डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मनसे आणि अन्य पक्षांतील अनेक इच्छुक प्रवेश करणार होते. मात्र, दानवे यांनी नाशिकला येऊच नये यासाठी भाजपातील काही स्थानिक नेते प्रयत्नशील असल्याचे मनसेतून येऊ इच्छिणाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. अखेरीस शुक्रवारी दानवे यांनीच निरोप धाडला आणि तूर्तास कार्यक्रम पुढे ढकलण्याची सूचना केली आहे. गुरुवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात दानवे यांच्या पायाला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांच्या दौरा स्थगित होण्यामागे राजकीय कारण वा सल्ला नसल्याचे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले. सदरचा दौरा रद्द झाल्याने प्रवेश सोहळ्याच्या तयारीवर पाणी फेरले गेले आहे, तर दुसरीकडे नामुष्की टळल्याने मनसेच्या स्थानिक नेत्यांना तूर्तातूर्त दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)