शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

पिसाळलेल्या कुत्र्याचा सात जणांना चावा

By admin | Updated: November 11, 2015 22:00 IST

येवला : न्याहारखेडेत ऐन दिवाळीत ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण

येवला : तालुक्यातील न्याहारखेडे येथे पिसाळलेल्या कुत्र्याने सात व्यक्तींसह गायीला चावा घेतला. यात तीन महिला व चार पुरुष आहेत. कुत्र्याने सणाच्या दिवशीच गावातील सात जणांना चावा घेतल्याची घटना घडल्याने आनंदावर विरजण पडले असून, कुत्र्याची परिसरात दहशत पसरली आहे.बुधवारी पहाटे ४ वाजता काळ्या रंगाचे एक कुत्रे वेगाने धावत आले आणि त्याने प्रथम देवीदास देवरे याला चावा घेतला. न्याहारखेडे येथे तीन महिला व तीन पुरुषांना चावा घेतला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार चावा घेणारी कुत्री वेगवेगळ्या रंगाची होती. या सहा रुग्णांना येवला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. ग्रामीण अधीक्षक डॉ. एस.डी. सदावर्ते, डॉ. पंकज पाटील यांनी जखमी व्यक्तीवर औषधोपचार केले. परंतु चावा घेणारे कुत्रे हे पिसाळलेले असल्याने रुग्णांना नाशिक येथील सरकारी रु ग्णालयात पुढील उपचार घेण्यासाठी पाठवण्यात आले. अ‍ॅड.माणिकराव शिंदे व नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे यांनी जखमींची विचारपूस करीत त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देत नाशिक येथे रवाना केले. न्याहारखेडा येथील बाबाबाई गंगाधर देवरे (९०), शोभाबाई शंकर देवरे (५०), पद्माबाई साहेबराव आहिरे (५०), सुखदेव शंकर गरुड (८०), सागर सुदाम देवरे (२०), देवीदास कृष्णा देवरे (१५), अप्पासाहेब दत्तू देवरे (२७) यांना तसेच एका गायीला या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे.येथील ग्रामस्थांनी या पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु कुत्री सापडली नाहीत. (वार्ताहर)