शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

विश्वास नांगरे-पाटील : महामॅरेथॉन स्पर्धा आपली ऊर्जामापक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 19:16 IST

नाशिक : धावण्याची पॅशन असलेल्या नाशिकसारख्या महानगरात ‘लोकमत’ची महा मॅरेथॉन डोळे दिपविणारीच असते. या महा मॅरेथॉनच्या स्पर्धा म्हणजे आपल्या ...

ठळक मुद्दे२५०हून अधिक पोलीस स्पर्धेत सहभागी होणार नाशिककरांचा उत्साह हा महामॅरेथॉनमध्ये कायमच दिसून येतो.

नाशिक : धावण्याची पॅशन असलेल्या नाशिकसारख्या महानगरात ‘लोकमत’ची महामॅरेथॉन डोळे दिपविणारीच असते. या महामॅरेथॉनच्या स्पर्धा म्हणजे आपल्या ऊर्जामापक असून, त्यातून धावणाऱ्यांना ऊर्जा, तर बघणाऱ्यांनाही अनोखी प्रेरणा मिळत असते, अशा शब्दांत तरूणांचे आयडॉल व नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महामॅरेथॉनविषयी गौरवोद्गार काढले.निमित्त होते, राजुरी स्टील प्रस्तुत नाशिक महामॅरेथॉनच्या ‘बीब कलेक्शन एक्स्पो’चे. शनिवारी (दि३०) उत्साहात अन्् जल्लोष पूर्ण वातावरणात महामॅरेथॉनसाठी नोंदणी केलेल्या धावपटूंनी आपली ‘तयारी’ या बिब एक्स्पोपासून केली. एक्स्पोच्या शुभारंभप्रसंगी नांगरे-पाटील यांनी उद्घाटक म्हणून बोलत होते.

त्र्यंबकरोडवरील फ्रावशी अकॅडमीच्या प्रांगणात एक्स्पोच्या दीपप्रज्वलनप्रसंगी व्यासपीठावर लोकमत महामॅरेथॉनच्या संकल्पक तथा संयोजक रुचिरा दर्डा, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, राजुरी स्टीलचे वितरक मनू चांदवानी, हेमंत कोठावदे, प्रकाश पटेल, एचडीएफसी होम लोन्स लिमिटेडचे बिजनेस हेड संदीप कुलकर्णी, विपणन प्रमुख समीर दातरंगे, एसएमबीटीचे हर्षल तांबे, फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलचे तांत्रिक संचालक अशोक थरानी, सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ, एलआयसीचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक तुलसीदास गडपायले, विपणनप्रमुख प्रदीप जोशी, कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक देवेश कारडा, अपोलो हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरी मेनन, अपोलोचे डॉ. मंगेश जाधव, सोनी गिफ्ट्सचे संचालक नितीन मुलतानी, साक्षी अ‍ॅडव्हर्टायजिंगचे संचालक सचिन गिते, स्टर्लिंग मोटर्सचे महाव्यवस्थापक महेश राठी, सह्याद्री फार्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षितीज अग्रवाल, वरुण अ‍ॅग्रोच्या संचालक मनीषा धात्रक आणि शशीकांत धात्रक, न्यूट्रिकेअरच्या रश्मी सोमाणी, गौरव सोमाणी, मधुर जयदेव गृह उद्योगचे संचालक धर्मेंद तरानी, जेम्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रमुख आणि स्थायीच्या माजी सभापती हिमगौरी आडके, रिलॅक्स झीलचे संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना नांगरे-पाटील म्हणाले, यांनी मी पूर्वीपासून स्वत:च्या तंदुरुस्तीवर भर देत आलो. त्यादृष्टीने व्यायामासाठी वेळ देत आल्याचे नमूद केले. लोकमतच्या या महामॅरेथॉनमध्ये दरवर्षी पाच हजारांहून अधिक धावपटू सहभागी होत असतात. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सुयोग्य असे नियोजन आणि त्यामध्ये असलेली सुसुत्रता. उत्कृष्ट नियोजनामुळेचे मॅरेथॉनचे सर्व निकष ही स्पर्धा पुर्ण करणारी ठरते, त्यामुळे या स्पर्धेेत सहभागी होऊन धावण्याचा अनुभव स्पर्धकांना खूप काही शिकवून जातो, असेही नांगरे पाटील म्हणाले. माझ्यासह तब्बल २५०हून अधिक पोलीस सहकारी स्पर्धेत सहभागी होणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रास्ताविकात बोलताना लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी महामॅरेथॉनच्या तृतीय पर्वातही नागरिकांचा प्रचंड उत्साह दिसून येत असून अशाच जल्लोषात रविवारी (दि.१) हजारो स्पर्धक नाशिककर धावनमार्गांवरून धावत ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होणार आहेत. नाशिककरांचा उत्साह हा महामॅरेथॉनमध्ये कायमच दिसून येतो. दिवसभराच्या कार्यक्रमात अ‍ॅँकर विशू यांनी अनेक मान्यवर, पाहुण्यांच्या आणि उत्साही धावपटू गटप्रमुखांच्या मुलाखती घेऊन कार्यक्रमात रंगत भरली.

 

टॅग्स :NashikनाशिकMarathonमॅरेथॉनLokmat Eventलोकमत इव्हेंटVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील