Birthday of Karmaveer Bhaurao Patil at Chandori Vidyalaya | चांदोरी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती

चांदोरी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती

ठळक मुद्देमान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पुजन करु न दीपप्रज्वलन करण्यात आले.

चांदोरी : येथील न्यु इंग्लिश स्कुलमध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य सुभाष सोमवंशी यांनी स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पुजन करु न दीपप्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी देवराम निकम, माणिक गायखे, अमृत टर्ले,लक्ष्मण टर्ले, विनायक पाटील तसेच पांडुरंग पगारे, एम. एफ टर्ले, योगेश पाटील, सागर गडाख, आशिष गायखे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवाजी टर्ले, सुनील खालकर, उपप्राचार्य इंद्रकुमार त्र्यंबके, भाऊसाहेब माने, पांडुरंग जगताप, राजाराम टर्ले, संजय शेटे, वसंत टर्ले, विष्णू कोरडे, सुनिल रासकर आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन वैशाली टर्ले यांनी तर आभार विष्णू कोरडे यांनी मानले.

Web Title: Birthday of Karmaveer Bhaurao Patil at Chandori Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.