ओझर टाउनशिप : कोकणगाव ते कसबे सुकेणे मार्गावर मोटारसायकलस्वाराला अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे तोल जाऊन चालकास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.रविवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास बाळासाहेब महादू गायकवाड (४५) राहाणार बेघरवस्ती रेल्वेस्टेशन कसबे सुकेणे हे त्यांच्या मोटारसायकलने (एम एच १५ व्हीडी १९४१) कसबे सुकेणे कडून कोकणगावकडे जात असतांना या रस्त्यावरील चारी जवळील हॉटेल आमराईसमोर अज्ञात वाहनाने मोटारसायकलला कट मारल्यामुळे गायकवाड यांचा तोल जाऊन ते मोटारसायकलसह रस्त्यावर पडले व गंभीर जखमी झाले. त्यांना रूग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला़
सुकेणे मार्गावर दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:30 IST