दिल्लीतील आंदोलकांच्या समर्थनार्थ नाशिक मध्ये बाईक रॅली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 03:38 PM2021-01-26T15:38:29+5:302021-01-26T15:38:42+5:30

शहरातील विविध मार्गावरून फिरवत या रॅलीचा नाशिकरोड येथे समारोप करण्यात आला.

Bike rally in Nashik in support of Delhi farmer protesters | दिल्लीतील आंदोलकांच्या समर्थनार्थ नाशिक मध्ये बाईक रॅली

दिल्लीतील आंदोलकांच्या समर्थनार्थ नाशिक मध्ये बाईक रॅली

Next

नाशिक - केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीत आणि मुंबईत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज नाशिकमध्ये किसान सभा, आयटक आणि श्रमिक सेवा संघाच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली. सीबीएस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालिमार ते नाशिकरोड ही रॅली काढण्यात आली. 
 
शहरातील विविध मार्गावरून फिरवत या रॅलीचा नाशिकरोड येथे समारोप करण्यात आला. यावेळी कॉ.  राजू देसले, संघटनेचे नेते महादेव खुडे, रिपब्लिकन पक्षाचे नेते शशिकांत उनव्हणे यांनी  मनोगत व्यक्त व्यक्त करताना केंद्र सरकारवर टीका केली.

या बाईक रॅलीत भाकपचे दत्तू तुपे तसेच छात्रभारतीचे पदाधिकारी आणि नाशिक महापालिकेचे घंटागाडी कामगार सहभागी झाले होते.
 

Web Title: Bike rally in Nashik in support of Delhi farmer protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.