अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट! रुपाली चाकणकरांना 'SIT'चे समन्स?; संस्थेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची चौकशी होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 14:03 IST2026-03-29T13:50:37+5:302026-03-29T14:03:22+5:30
नाशिक येथील भोंदू अशोक खरात याला कोर्टाने १ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली. आता या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट! रुपाली चाकणकरांना 'SIT'चे समन्स?; संस्थेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची चौकशी होणार
नाशिक येथील भोंदू अशोक खरात याला कोर्टाने १ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली. आता या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे, एसआयटीने चाकणकर यांनाही समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.
अशोक खरातच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ! सुनावणीवेळी कोर्टात खरात काय म्हणाला?
शिवानिका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एसआयटी सर्व आजी माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती समोर येत आहे. रूपाली चाकणकर यांची देखील एसआयटी कडून आता चौकशी होण्याची शक्यता आहे. शिवानीका संस्थांचे सर्व व्यवहार आता SITच्या रडारवर आला आहे. यामुळे आता एसआयटी या सर्वांची चौकशी करणार आहे.
अशोक खरातच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ!
नाशिकमधीलअशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले. या प्रकरणात आतार्यंत आठ महिलांनी त्याच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याच्याविरोधात तक्रारी देण्यासाठी अजूनही महिला पुढे येत आहेत. दरम्यान, आज खरात यांच्या पोलिस कोठडीत कोर्टाने पुन्हा वाढ केली असून आता १ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अशोक खरात याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती.
महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खरातचा तपास करण्यासाठी एसआयटीला अधिक कालावधीची गरज असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.
अशोक खरात याला आज सकाळी ११.३० वाजता कोर्टात आमण्यात आले. न्यायमूर्ती श्रीमती एम. व्ही. भराडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एसआयटीचे तपासी अधिकारी किरण सूर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी खरातच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी सरकारी पक्षाने युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपी हा तपासात सहकार्य करत नाही. त्याने मोबाईलमध्ये अनेक नावे डमी किंवा कोडवर्ड मध्ये सेव्ह केली असण्याची शक्यता आहे, यामध्ये काही राजकीय व्यक्तींचाही समावेश असू शकतो. तसेच, पीडित महिलांना तो जे द्रव्य किंवा पाणी पाजत होता, त्याबाबतही सखोल तपास करायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.