शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा! कोकाटेंच्या शिक्षेला कोर्टाने स्थगिती दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:17 IST

मंत्री माणिकराव कोकाटे यांना कार्टाने मोठा दिलासा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. काही दिवसापूर्वी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आता कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला जिल्हा व सत्र न्यायालय यांनी स्थगिती दिली आहे.

मोठी बातमी! राज्य सरकारने दिला दिलासा; प्रतिज्ञापत्रांसाठी लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ

 कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय काेकाटे यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबत राखून ठेवलेल्या निकालाची सुनावणी आज जिल्हा सत्र न्यायालयात झाली. या सुनावणीत कोकाटे बंधूंना मोठा दिलासा मिळाला आहे.

आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळत ही सुनावणी आज ५ मार्च रोजी घेण्यात आली.  यापूर्वी झालेल्या सुनावणीत कोकाटे यांच्यासह त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना कागदपत्र फेरफार अन् फसवणूक केल्याप्रकरणी दोषी धरण्यात आले होते. १९९५ ते ९७ मध्ये सरकारच्या दहा टक्के कोट्यातून घर घेतल्याचा आरोप काेकाटे यांच्यावर आहे.

या निर्णयाला कोकाटे यांनी आव्हान देत शिक्षा स्थगितीसाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर युक्तिवाद झाल्यानंतर कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत १ मार्च रोजी यासंदर्भात निकाल देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्याचदरम्यान शनिवारी सकाळी ॲड. सतीश वाणी आणि आशुतोष राठोड यांनी पुन्हा शिक्षेच्या स्थगितीला आदेश देणाऱ्या याचिका दाखल करीत त्यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयांचा दाखला दिला. त्यानुसार शिक्षेची स्थगिती उठवून आ. कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवावी, ही मागणी त्यात करण्यात आली होती. मात्र, जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन जीवने यांनी स्थगिती देण्याची याचिका फेटाळत याचिकाकर्त्यांना वरिष्ठ न्यायालयात हरकत दाखल करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली. तीन दिवसांत तुम्ही उच्च न्यायालयात जा अथवा ५ मार्च रोजी निकाल जाहीर करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. दरम्यान, आज यावर सुनावणी झाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

१९९५ साली कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचा आरोपाखाली कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि सुनील कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरू होता. ३० वर्षांनी या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने अंतिम निकाल दिला होता. यामध्ये  माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. यासह दोघांनाही न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल केली होती. भारतीय दंड विधान ४२०, ४६५, ४७१ आणि ४७ अन्वये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेNCPराष्ट्रवादी काँग्रेसCourtन्यायालय