Bicycle collision; One killed, three wounded | दुचाकींची धडक; एक ठार, तीन जखमी
दुचाकींची धडक; एक ठार, तीन जखमी

वणी : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वेगावरील नियंत्रण सुटल्याने दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून, तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.१६) घडली. नांदुरीकडून वणीकडे एमएच १५ जीएच ७३०७ या दुचाकीवरून विजय दत्तू गावित (१९, रा. पारेगाव, ता. चांदवड) जात होता. वणी शिवारातील खांडे मळ्याजवळ विजयने ओव्हरटेक केले; मात्र त्याचवेळी समोरून येणाऱ्या एमएच १५ डीडब्ल्यू ६१८८ या दुचाकीला विजयच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात विजयचा मृत्यू झाला. तर किरण सुरेश गावित, संदीप शांताराम गांगोडे, अक्षय हिरामण माळेकर हे तिघे जखमी झाले. याबाबत वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Web Title: Bicycle collision; One killed, three wounded
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.