मुक्तीभूमीस भुजबळांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 01:07 IST2021-10-11T01:07:03+5:302021-10-11T01:07:49+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारकास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी मुक्तीभूमीवरील नर्सरीचे उद्घाटनही भुजबळ यांचे हस्ते झाले.

Bhujbal's visit to Muktibhumi | मुक्तीभूमीस भुजबळांची भेट

मुक्तीभूमीस भुजबळांची भेट

येवला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारकास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी मुक्तीभूमीवरील नर्सरीचे उद्घाटनही भुजबळ यांचे हस्ते झाले. स्मारकाच्या संशोधन अधिकारी तथा व्यवस्थापक पल्लवी पगारे यांनी बार्टीच्या वतीने पालकमंत्री भुजबळ यांचे स्वागत केले. यावेळी भीमस्तुती व तथागत बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले. यावेळी बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या कल्पनेतून साकारलेल्या मुक्तीभूमी येथील कायमस्वरूपी नर्सरीचे उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास पर्यवेक्षक सिद्धार्थ हिरे, राष्ट्रवादी सेलचे शहराध्यक्ष सुभाष गांगुर्डे, पोलीस निरीक्षक भगवान माथुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश पाटील, गोटू मांजरे, सचिन कळमकर, बाळासाहेब लोखंडे, भगवान साबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Bhujbal's visit to Muktibhumi