मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे भुजबळ आडमार्गाने बांधावर; अवकाळीमुळे पाहणी दौरा
By धनंजय वाखारे | Updated: November 30, 2023 13:12 IST2023-11-30T13:12:30+5:302023-11-30T13:12:43+5:30
विंचूर चौफुलीवर आंदोलकांची घोषणाबाजी

मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे भुजबळ आडमार्गाने बांधावर; अवकाळीमुळे पाहणी दौरा
येवला ( नाशिक): मंत्री छगन भुजबळ आज आपल्या येवला मतदारसंघात अवकाळी मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. भुजबळ या पाहणी दौऱ्यात ठिक ठिकाणी मराठा आंदोलकांच्या विरोधाचा सामना करावा लागतो आहे.
भुजबळ आड मार्गाने आंदोलकांना हुलकावणी देत बांधावर पोहोचत आहेत तर आंदोलक रस्त्यावर घोषणाबाजी करत असल्याचे चित्र आहे. सोमठाण देश, विंचूर चौफुली, कोटमगाव याठिकाणी भुजबळ यांच्या विरोधात आंदोलक रस्त्यावर उतरले. कोटमगाव येथे त्यांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी ह झाली.