Ashok Kharat Bhondu Baba Nashik: तुमच्या आयुष्यात असं घडून गेलं आहे. तुमचे पतीसोबत सतत वाद होत असतात. पत्नीसोबत जमत नाहीये. तुमच्या घरात सतत भांडणं सुरू असतात. गेल्या काही वर्षांपासून आर्थिक परिस्थिती ढासळत आहे. तुम्हाला मूल होत नाही म्हणून त्रास होतोय, हे आणि अशाच प्रकारे कुणी त्रासातून जाणाऱ्या महिलेला किंवा पुरुषाला बोललं तर त्या व्यक्तीला आश्चर्य वाटू शकतं आणि इतकं सगळं हा माणूस सांगतोय तर त्याच्याकडून नक्कीच माहिती असेल. असा विचारही मनात येऊ शकतो आणि विश्वास बसू शकतो. हीच पद्धत अशोक खरात लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यसाठी करायचा. लोकांना त्यांच्या भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची माहिती सांगायचा. पण, ही माहिती गोळा करण्यासाठी त्याने काही माणसे ठेवले होती, असेही आता समोर आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील भोंदू अशोक खरात हा आपण स्वतः अवतारी पुरुष असल्याचे भासवून भागटेगिरी करत होता. ज्योतिष पहायला येणाऱ्या लोकांची माहिती तो अगोदरच काढत असे. त्याआधारे लोकांना त्यांचा भूतकाळ सांगून प्रभावित करत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अशोक खरातचे लोक कसे मिळवायचे माहिती?
एखादा जादूगार हातचलाखी करून समोरच्या व्यक्तीवर प्रभाव टाकतो तसेच खरात करत होता. एखाद्याला खरातला भेटायचे असेल तर त्याची अगोदर वेळ घ्यावी लागत होती.
कुणाच्या ओळखीने तुम्ही संपर्क केला आहे असे त्याचे कर्मचारी ग्राहकाला विचारून घेत होते. त्याआधारे भेटीला येणाऱ्या व्यक्तींची माहिती खरात अगोदरच काढून ठेवत असे. ग्राहक गेला की त्याचा सर्व भुतकाळ खरात सांगायचा. त्यामुळे लोकांना वाटायचे या बाबाकडे मोठी विद्या असावी. याआधारे लोकांचा विश्वास संपादन करत तो अघोरी कृत्य करत होता.
जादू दाखवण्यासाठी दोरीने हलवायचा कलश
जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार ईशान्येश्वर मंदिराच्या परिसरात नकली साप सोडून तो लोकांना फसवत होताच, पण कलश पूजाही तो कलशाला दोरी बांधून करायचा.
तो ग्राहकांना त्यांच्या अडचणी विचारून कलश दोरीने हलवायचा. कलश विशिष्ट दिशेला झुकल्यास त्यानुसार त्याचे अर्थ लावून तो ग्राहकांना विविध विधी करायला लावत होता, अशी माहितीही पोलिस तपासात समोर आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातही खरातचे अनेक भक्त
खरात याचे अहिल्यानगर जिल्ह्यातही अनेक भक्त होते. अनेकजण त्याच्याकडे जात होते. मात्र, त्याचे विकृत रूप समोर आल्यामुळे त्याच्या भक्तांनीही आता मौन धारण केले आहे.
Web Summary : Ashok Kharat, a fraudulent godman, posed as an avatar. He gathered personal information about visitors through informants. Kharat then used this information during meetings to deceive people, bolstering his image with staged tricks.
Web Summary : फर्जी बाबा अशोक खरात अवतार होने का दिखावा करता था। वह मुखबिरों के माध्यम से आने वाले भक्तों की निजी जानकारी जुटाता था। फिर खरात बैठकों के दौरान लोगों को धोखा देने के लिए इस जानकारी का इस्तेमाल करता था, और मंचित चालों से अपनी छवि को बढ़ाता था।