शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अंधांसाठी वामनदादांच्या गीतांची ‘भीमज्योत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:21 IST

लोककवी वामनदादा कर्डक यांची गीते शहरापासून गाव खेड्यांपर्यंत आजही गायिली जातात. आंबेडकरी चळवळीपासून सुरू झालेली दादांची गीते आजच्या परिस्थितीतही तितकीच समर्पक असल्याने त्यांच्या गीतांचा गोडवा कायम आहे.

नाशिक : लोककवी वामनदादा कर्डक यांची गीते शहरापासून गाव खेड्यांपर्यंत आजही गायिली जातात. आंबेडकरी चळवळीपासून सुरू झालेली दादांची गीते आजच्या परिस्थितीतही तितकीच समर्पक असल्याने त्यांच्या गीतांचा गोडवा कायम आहे. सर्वसामान्यांना आपल्या आयुष्याचे गाणे वाटणाऱ्या दादांची गीते अंध बांधवांनादेखील तितकीच जवळची असल्याने अंध बांधव दादांची गीते सर्वाधिक सादर करीत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. हीच बाब ओळखून प्राध्यापक शरद शेजवळ यांनी ‘भीमज्योत’ या काव्यसंग्रहातून अंधांना दादांच्या गीतांची नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे. वामनदादा यांच्या गीतांचा हा संग्रह त्यांनी ब्रेललिपीत तयार केला असून, अशाप्रकारचा हा पहिलाच ब्रेललिपी गीतसंग्रह मानला जात आहे.  आंबेडकरी चळवळीत लोककवी वामनदादा कर्डक यांच्या शाहिरी जलशातून मोठी लोकचळवळ उभी राहिली आणि आंबेडकरी चळवळीला धार मिळाली. वामनदादांच्या स्फूर्तीगीतांनी पेटलेल्या समाजात चेतना निर्माण झाली. तळागाळातील माणसं वामनदादांची गीते गुणगुणू लागली. दादांच्या गीतांची ही जादू आजही कायम आहे. अंध बांधव वामनदादांची गाणी ऐकून ती सर्वाधिक म्हणतात. याच बांधवांसाठी ब्रेललिपीत वामनदादांचा गीतसंग्रह तयार करण्यात आला आहे. महात्मा फुले, आंबेडकरी जलशांची समृद्ध परंपरा ही आंबेडकरी गीत रचनांना असून, वामनदादा कर्डक यांची अनेक अलिखित-अप्रकाशित गाणी आजही गाव-खेडे, पाडे, वाडी-वस्ती, तांडा, गावकुसाबाहेर- ओवी, जात्यावर आणि मोर्चे, आंदोलने यात प्रबोधन- परिवर्तन क्र ांतिगीते व स्फुर्तीगीते म्हणून गायिली जातात. ४३ गीतांचा संग्रह आता अंधजनांना ब्रेललिपीत उपलब्ध झाला आहे.  सन २०१३ला वामनदादा कर्डक यांच्या उपस्थितीत वामनदादा प्रतिष्ठानची घोषणा झाली आणि नाशिक शहरातील रुंग्ठा विद्यालयातील रात्र शाळा व उत्तर महाराष्ट्रातील अंध-अपंग विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन वामनदादांनी सन्मानित केले. एका अंध मुलाचा सत्कार करताना त्यांचे डोळे पाणावले दादा भावुक झाले. त्या अंध मुलाने दादांचे गीत सादर कले. त्याचवेळी प्रतिष्ठानने दादांची गीते ब्रेललिपीत अंधांसाठी उपलब्ध करून देण्याची शपथ घेण्यात आली. त्याची पूर्तता शेजवळ यांच्या प्रयत्नाने झाली आहे. समाज प्रबोधनाचा ४३ गीतांचा संग्रह‘भीमज्योत’ नावाने ब्रेललिपीतून दादांच्या ४३ गीतांचा हा संग्रह लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक कार्याध्यक्ष प्राध्यापक शरद शेजवळ यांनी संपादित केला आहे, तर विकास शेजवळ व रामदास जगताप (दि ब्लार्इंड वेलफेअर असोसिएशन इंडिया नाशिक) यांनी मुद्रण केले आहे. दीक्षा प्रशील प्रकाशन नाशिकने तो प्रकाशित केला आहे. एकूण ४३ गीतांचा सामाजिक प्रबोधन गीतांचा हा संग्रह भारतातील पहिला आंबेडकरी (ब्रेललिपीतील) गीतसंग्रह ठरला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक