शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

संमेलनाध्यक्षपदासाठी विदर्भाकडून भारत सासणे, नारळीकरांच्या अटी महामंडळ मान्य करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 4:58 AM

नागपूर : नाशिक येथे नियोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचे नाव जाहीर होण्याच्या एक दिवस आधी ...

नागपूर :नाशिक येथे नियोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचे नाव जाहीर होण्याच्या एक दिवस आधी राजकारण, साहित्यकारण आणि अट-कारणाचा खेळ रंगला आहे. जयंत नारळीकर, भारत सासणे आणि जनार्दन वाघमारे यांच्यापैकी एक नाव निश्चित होणार आहे.   संमेलनस्थळ जाहीर होताच भारत सासणे यांचे अध्यक्षपदासाठीचे नाव अग्रक्रमाने चर्चेत आले होते. घुमान साहित्य संमेलनातील मानापमान नाट्यामुळे, महामंडळ अध्यक्षांची पसंती त्यांच्याच नावाला असल्याचेही बोलले जाते. विदर्भ साहित्य संघासाठीही विषय असल्याने घटकसंस्था म्हणून भारत सासणे यांचे नाव सुचविण्यात आले आहे.स्वागताध्यक्ष म्हणून छगन भुजबळ यांच्याच नावाची चर्चा आहे. अध्यक्षपदासाठी जेव्हा निवडणुका घेतल्या जात होत्या तेव्हा विदर्भ साहित्य संघ ज्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करेल, तोच उमेदवार अध्यक्षपदी विराजमान होत असल्याचा इतिहास आहे. मात्र, जेव्हापासून निवडणुका बाद करण्यात आल्या, तेव्हापासून चित्र बदलले आहे. महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघ यांच्यात सासणे यांच्या नावावरून एकमत होत असल्याने सासणेच अध्यक्ष होतीत, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.गेल्या संमेलनात परंपरा खंडितगेल्या संमेलनात संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची ऐनवेळी प्रकृती बिघडली होती. त्यावेळी त्यांनी व्हीलचेअरवर उपस्थित राहून संमेलनाचे उद्घाटन केले होते आणि नंतर उपचारासाठी मुंबईला गेले होते. प्रथमच संमेलनाध्यक्षांच्या अनुपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला होता. यंदा नारळीकरांनी सादर केलेली अट महामंडळाने मान्य केल्यास, इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. अशा स्थितीत अनेक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :nagaland-pcनागालँडNashikनाशिक