शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा तळपल्या तलवारी-कोयते

By admin | Updated: November 14, 2015 23:30 IST

पंचवटी : पाथरवट लेनमध्ये गुंडांची सिनेस्टाइल दहशत; हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी

 पंचवटी : किरकोळ कारणावरून भरदिवसा हातात तलवारी, कोयते घेऊन दहशत पसरवित टोळक्याने एका रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना पाथरवट लेन येथे घडली आहे. रिक्षाचालकावर हल्ला करणाऱ्या चौघा संशयितांना पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांंचे साथीदार मात्र पसार झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता घटना घडली. या घटनेत नागचौकात राहणारा गणेश शिंदे हा रिक्षाचालक जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सतीश विष्णू शिंदे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार संशयितांवर बेदम मारहाण व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथरवट लेन येथील रहिवासी आकाश उर्फ बल्ल्या लाटे तसेच त्याचे साथीदार नदीम जहॉँगीर मुल्ला (रा. संजयनगर, हिरावाडी), केतन थोरात, रमेश गांगुर्डे, राहुल शिंदे, बबलू भवर, नाग्या, मन्ना आदिंनी किरकोळ कारणावरून कुरापत काढून पाथरवट लेन, गजानन चौक तसेच नागचौक परिसरात हातात तलवारी, कोयते घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिसरातून घराकडे रिक्षा घेऊन जाणाऱ्या शिंदे याला रस्त्यात अडवून त्याच्या डोक्यावर, मानेवर वार केले. पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे, हवालदार श्रीराम सपकाळ, नीलेश पवार, संजय राऊत, एस. एस. नरवडे आदिंनी धाव घेत संशयितांना हत्यारासह ताब्यात घेतले. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांना येत्या सोमवार (दि.१६) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी समयसूचकता दाखवल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, ताब्यात घेतलेले सर्वच संशयित गुन्हेगारी टोळीशी संबंधित असून, त्यांची परिसरात दहशत असल्याची चर्चा आहे. त्यांना परिसरातील काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पाठबळ देत असून, त्यामुळेच दहशत वाढल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)