शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या प्रवासातही मिळेना चांगला रस्ता

By admin | Updated: August 4, 2014 02:13 IST

अखेरच्या प्रवासातही मिळेना चांगला रस्ता

 

प्रवीण साळुंके

मालेगावयेथील महापालिका हद्दीतील पश्चिम भागात रस्त्यांची दुरवस्था ही नित्याच्याचीच बाब आहे. जिवंतपणी तर नाहीच पण मृत्यूनंतरच्या अखेरच्या प्रवासासाठीही चांगला रस्ता मिळू नये यासारखे दुर्दैव नाही. येथील मोचीवाडा भागात शिवाजीनगर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे अंतिम संस्काराला जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. महानगरपालिका दरवर्षी रस्त्यांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे दाखवित असताना शहराच्या पूर्व भागात बोटावर मोजण्याइतके रस्ते सोडल्यास सर्वच रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे, पश्चिम भागात तर विनाखड्ड्याचा रस्ता हा संशोधनाचा विषय आहे. नागरिकांना चांगल्या रस्त्याची अपेक्षा किंवा सवयच नसल्याने जिवंतपणी त्यांना खड्ड्याच्या रस्त्यावर वावरणे भाग पडते. मात्र अंतिम संस्काराला जाण्याचा रस्ता तरी किमान चांगला असावा अशी कॅम्पवासीयांची अपेक्षा आहे. मात्र संवेदनहीनतेचा कळस गाठलेल्या मनपाकडून ही अपेक्षाही पूर्ण होताना दिसत नाही. कॅम्प भागातून अंतिम संस्कारासाठी शिवाजीनगर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर उंचवटे, चाऱ्या व खड्डे पडलेले असल्याने अंत्ययात्रा नेताना हाल होतात. पायी जाणाऱ्यांचे पाय एकमेकांत अडकत असल्याने मृतदेह पडण्याची शक्यता असल्याने जीवमुठीत धरून चालावे लागते. अंतिम संस्कारास वैकुंठरथाचा वापर केल्यास या रस्त्यावरून ही रथयात्रा जात असताना उंचवट्यामुळे रथ खाली-वर होत असून, त्यामुळे मृतदेह खाली पडण्याची शक्यता असते. रस्त्यावरील खड्डे व चाऱ्यांमध्ये धक्के बसल्याने काहीवेळा अंत्यविधीसाठी वापरण्यात येणारे मडके फुटते तसेच मृतदेहाशेजारी बसलेले नातेवाईक एकमेकांवर आदळतात, तर काहींच्या डोक्याला वाहनाचे टप लागते. त्यामुळे हा रस्ता कधी संपतो? असा प्रश्न पडतो. त्यातच रस्ता कमी रुंदीचा असून, त्यावर अतिक्रमण आहे. रस्त्यावर नेहमीच मोठ-मोठे दगड पडलेले असतात. अनेक रस्ते महिनाभरात, तर बुजविलेले खड्डे काही तासातच पूर्ववत होत असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नव्वद लाख रुपये खर्चाचा सटाणा रस्ता तसेच कोट्यवधी रुपये खर्च करूनही गेल्या पाच वर्षांत पूर्ण न झालेला कॅम्प रस्ता होय. जिवंतपणी मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेने किमान स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते खड्डेमुक्त करावेत, अशी अपेक्षा कॅम्पवासीयांनी व्यक्त केली आहे.