घरकुलाचे छप्पर कोसळून लाभार्थी महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:56 IST2021-03-11T21:22:20+5:302021-03-12T00:56:01+5:30

सुरगाणा : तालुक्यातील बारागाव डांग विभागातील ग्रामपंचायत गोंदुणे अंतर्गत पिंपळसोंड येथे इंदिरा आवास योजनेचे घरकुलाचे छप्पर अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत राहीबाई सोमा गावित (५३) या लाभार्थी महिलेचा मृत्यू झाला तर तिचे पती सोमा गावित (५८) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Beneficiary woman dies after roof collapse | घरकुलाचे छप्पर कोसळून लाभार्थी महिलेचा मृत्यू

पिंपळसोंड येथे इंदिरा आवास योजनेचे कोसळलेले घर.

ठळक मुद्देपिंपळसोंड येथील घटना : हप्ता न मिळाल्याने अर्धवट बांधकाम

सुरगाणा : तालुक्यातील बारागाव डांग विभागातील ग्रामपंचायत गोंदुणे अंतर्गत पिंपळसोंड येथे इंदिरा आवास योजनेचे घरकुलाचे छप्पर अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत राहीबाई सोमा गावित (५३) या लाभार्थी महिलेचा मृत्यू झाला तर तिचे पती सोमा गावित (५८) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस पाटील रतन खोटरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी (दि.११) दीड ते दोन वाजेच्या सुमारास राहीबाई व तिचे पती सोमा गावित हे घरात जेवण करत असतांना अचानक पणे इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधलेले घरकुलाचे कौलारू छप्पर कोसळल्याने गंभीर जखमी होऊन राहीबाईचा जागीच मृत्यू झाला तर पतीला गंभीर दुखापत झाली आहे.

अलगदपणे ठेवलेले खांब कोसळल्याने पूर्ण घरच ढासळून जमिनदोस्त झाले. पिंपसोंड हा भाग गुजरात सिमावर्ती लगत असून अतिदुर्गम आहे. महिलेचे नातेवाईक मजुरी करीता बाहेरगावी गेले होते. ते आल्यावर रात्री उशिरा
मृतदेह शवविच्छेदना करीता ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला
असून शवागारात ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.१२) सकाळी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सागर नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रभाकर सहारे, चंद्रकांत दवंगे हे करीत आहेत.
कोट....

पाच ते सात वर्षापूर्वी सदर लाभार्थी महिलेस इंदिरा आवास योजनेचे घरकुल मिळाले होते. घरकुलाचा पहिला हप्ता लाभार्थी महिलेस मिळाला मात्र पुढील हप्ते अद्यापही मिळाले नाहीत.
आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने घरकुलाचे बांधकाम पूर्ण करता आले नाही. दुसरे घर नसल्याने अपुर्ण असलेल्या घरातच नाईलाजाने रहावे लागत होते. घरकुलाच्या जोत्यावर पैशांअभावी विट बांधकाम न करता आल्याने अलगदपणे ठेवलेले खांब कोसळल्याने पुर्ण घरच ढासळून जमिनदोस्त झाले. यातच लाभार्थीचा दबून मृत्यु झाला.

- सोन्या बागुल, माजी ग्रा.पं. सदस्य

इंदिरा आवास योजनेचे घरकुल अंगावर कोसळून घरातच लाभार्थीचा मृत्यू झाला हि अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून याबाबत तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश तलाठी एम.के. गायकवाड यांना दिले आहेत.
- किशोर मराठे, तहसिलदार.

Web Title: Beneficiary woman dies after roof collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.