अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 18:09 IST2018-11-24T18:09:12+5:302018-11-24T18:09:43+5:30
नाशिक : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विवाहाची मागणी घालणाऱ्या संशयितास नकार दिला असता त्याने मारहाण केल्याची घटना राणेनगर परिसरात घडली आहे़ पोलिसांनी संशयित मनीष संजय दोंदे (१९, रा. राणेनगर, सिडको) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण
नाशिक : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विवाहाची मागणी घालणाऱ्या संशयितास नकार दिला असता त्याने मारहाण केल्याची घटना राणेनगर परिसरात घडली आहे़ पोलिसांनी संशयित मनीष संजय दोंदे (१९, रा. राणेनगर, सिडको) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़
इंदिरानगर पोलीस ठाण्यात पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार १ फेबु्रवारी ते २३ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ती महाविद्यालयात शिकवणीसाठी जात असे़ या कालावधीत संशयित दोंदे हा तिला राणेनगर परिसरात अडवून विवाहाची मागणी घालीत असे़ पीडित मुलीने विवाहास नकार देताच त्याने रस्त्यातच मारहाण केली, तसेच तुझ्या घरी सांगून तुझी बदनामी करील, अशी धमकी दिली़
या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करून संशयित मनीष दोंदे यास अटक केली आहे़