शरणपूर रोडवर ब्युटीपार्लरच्या आड देहव्यापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 17:08 IST2018-10-13T16:56:55+5:302018-10-13T17:08:58+5:30
नाशिक : शरणपूर रोडवरील राजीव गांधी भवनाशेजारी असलेल्या सुयोजित संकुलातील बार्बी ब्युटी पार्लरवर शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शुक्रवारी (दि़१२) दुपारी छापा टाकून देहव्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त केला़ पोलिसांनी या ब्युटीपार्लरमधून संशयित दीपाली नगरकर (४२, रा. सह्याद्रीनगर) व रवींद्र महाजन (३५, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) यांना अटक केली आहे़

शरणपूर रोडवर ब्युटीपार्लरच्या आड देहव्यापार
नाशिक : शरणपूर रोडवरील राजीव गांधी भवनाशेजारी असलेल्या सुयोजित संकुलातील बार्बी ब्युटी पार्लरवर शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शुक्रवारी (दि़१२) दुपारी छापा टाकून देहव्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त केला़ पोलिसांनी या ब्युटीपार्लरमधून संशयित दीपाली नगरकर (४२, रा. सह्याद्रीनगर) व रवींद्र महाजन (३५, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) यांना अटक केली आहे़
राजीव गांधी भवनाशेजारी असलेल्या सुयोजित संकुलातील तिसऱ्या मजल्यावरील गाळा नंबर बारामध्ये बार्बी ब्युटी पार्लर आहे़ या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती़ त्यानुसार दुपारी तीन वाजेच्या सुमारास छापा टाकला असता तीन पिडीत महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे समोर आले़ पोलिसांनी अडीच हजार रुपयांची रोकड, दोन मोबाईल, ब्युटी पार्लरमधील स्वयंचलित मशीन असा मुद्देमाल जप्त केला असून तीन महिलांची सुटका केली आहे़
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात पिटा अॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़