शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सतर्क रहा; मार्गदर्शक व्हा

By admin | Updated: September 23, 2016 01:39 IST

मोर्चा बंदोबस्त बैठक : कुंभमेळ्याचा अनुभव वापरण्याचा सिंघल यांचा सल्ला

 नाशिक : येत्या शनिवारी (दि.२४) शहरात काढण्यात येणाऱ्या मराठा समुदायाच्या मोर्चासाठी पोलीस दलाने सतर्क राहून मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, असे आवाहन पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी केले.मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्काराचा निषेध आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरात शनिवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी शहरात जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर आबालवृद्ध दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहराची वाहतूक व्यवस्था, सुरक्षाव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची बंदोबस्त आढावा बैठक गुरुवारी (दि.२२) दादासाहेब गायकवाड सभागृहात घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर पोलीस उपआयुक्त विजय पाटील, दत्ता कराळे, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत धीवरे, सहायक आयुक्त सचिन गोरे, डॉ. राजू भुजबळ आदि उपस्थित होते. प्रारंभी दृकश्राव्य यंत्रणेमार्फत उपस्थित पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना बंदोबस्ताचे सूक्ष्म नियोजन, वाहनतळाची व्यवस्था, वाहतूक मार्ग आदि बाबत माहिती देण्यात आली. शनिवारी दोन्ही परिमंडळांमध्ये पहाटे पाच वाजता पोलीस कर्मचारी हजर होतील आणि पोलीस ठाणे व सेक्टरनुसार वाहने घेऊन नियुक्तीच्या पॉइंटवर पोहचतील. दरम्यान, पॉइंटचे वाटप पोलीस ठाण्यांमधून होणार असून, मोर्चादरम्यान रस्त्यांवरून कुठल्याही प्रकारची सरकारी वाहने फिरणार नाही, याची दक्षता घ्यावी. कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याबाबत सतर्कता बाळगावी, पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वयंशिस्त पाळून देहबोलीचे भान ठेवावे आणि नागरिकांचे मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडावी. पोलीस दलावर कोणालाही टीकेची संधी मिळेल अशी वर्तणूक टाळा, मोर्चेकरी शिस्तीत संचलन करणार असल्याने पोलिसांनी त्यांना मार्गदर्शन करावे. वाहतूक सुरळीत ठेवावी. परस्परांमध्ये समन्वय ठेवून कुंभमेळ्याच्या बंदोबस्ताचा अनुभवाचा वापर करून चोख नियोजनबद्धपणे मोर्चा हाताळावा, अशा सूचना सिंघल यांनी यावेळी केल्या.‘कंट्रोल रूम’ला माहिती पुरवासकाळी दहा वाजेपासून सुरू होणारा मोर्चा तब्बल पाच ते सहा तास चालणार आहे. यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला वेळोवेळी अद्ययावत माहिती पुरवावी. जेणेकरून संभाव्य गैरसोय टाळणे शक्य होईल, असे सिंघल यावेळी म्हणाले. नियंत्रण कक्षामधील कर्मचाऱ्यांनीदेखील महत्त्वाचे संदेश तत्काळ प्रसारित करावे. (प्रतिनिधी)