शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘यू-ट्युब’च्या आधारे एटीएमवर डल्ला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 01:37 IST

काही दिवसांपूर्वी घरफोडीतील तिघांना जेरबंद करणाऱ्या सातपूर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोठी घरफोडी करण्याच्या इराद्यात असलेल्या तिघा संशयितांना अशोकनगर स्टेट बँकेच्या एटीएमजवळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घरफोडी करण्यासाठीचे साहित्य (गॅस कटर), फायटर आणि मोटरसायकल असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देटोळी ताब्यात : गॅस कटर, रेग्युलेटर, गॅसगन ताब्यात

सातपूर : काही दिवसांपूर्वी घरफोडीतील तिघांना जेरबंद करणाऱ्या सातपूर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोठी घरफोडी करण्याच्या इराद्यात असलेल्या तिघा संशयितांना अशोकनगर स्टेट बँकेच्या एटीएमजवळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घरफोडी करण्यासाठीचे साहित्य (गॅस कटर), फायटर आणि मोटरसायकल असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. स्टेट बॅँकेचे एटीएम यू-ट्युबच्या आधारे माहिती घेऊन फोडण्याचा त्यांचा इरादा होता, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त शांताराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.शनिवार रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सातपूर पिटर मोबाइलवरील सहायक पोलीस निरीक्षक संदीप वºहाडे हे पेट्रोलिंग करीत असताना अशोकनगर स्टेट बँकेच्या एटीएमजवळील अंधारात तीन जण तोंडाला रुमाल बांधलेले संशयास्पद हालचाल करीत असताना दिसले. पोलीस वाहन थांबवून त्यांना हटकले असता दोघेजण पळून जाऊ लागले. संशय आल्याने वºहाडे यांनी त्वरित डीबी मोबाइलवरील पोलीस कर्मचारी मनोहर सूर्यवंशी, डी. के. पवार, गोकुळ कासार, जावेद शेख, राजेंद्र घुमरे, सागर कुलकर्णी, तेजस मते, विनायक आव्हाड यांना बोलावून घेतले व पळून जाणाºया संशयितांचा पाठलाग करून पकडले. विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांच्याकडील मोबाइल ताब्यात घेऊन हिस्टरी तपासली असता यू- ट्यूबमध्ये ‘ताला तोडनेकी जाणकारी’ ‘चोरी करण्याच्या पद्धती’ असे व्हिडिओ पाहिल्याचे आढळून आले. सचिन रामभाऊ विश्वकर्मा (१९) रा. रामवाडी, पंचवटी, सचिन बाबूराव वड (२६) रा. रामवाडी आणि एक अल्पवयीन बालक अशी संशयितांची नावे असून, त्यांची अंग झडती घेतली असता पाठीवरील सॅकमधून तीन किलो वजनाचे गॅसटाकी (सिलिंडर), रेग्युलेटर, नोझल, नळी, गॅसगन, फायटर, यामाहा कंपनीची दुचाकी (क्रमांक एमएच १५ जीएस १८८९) असा ८० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या तिघा संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोहर सूर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक