सिडको : महापालिकेच्या वतीने नागरिकांना स्वच्छतेचे धडे दिले जात असले तरी मनपाच्याच सिडको विभागीय कार्यालय इमारतीच्या मागील आवारात मोठ्या प्रमाणात खराब झालेले विद्युत पोल व इतर नादुरुस्त असलेले साहित्य तसेच घाण व कचरा साचलेला असल्याने सदरचे आवार हे भंगाराचे गुदाम असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयाची इमारत गेल्या अनेक वर्षांपासून बांधण्यात आली असून, इमारतीचा दर्शनी भाग चांगला दिसत असला तरी मागील आवारात मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला आहे. याच ठिकाणी मनपाने खराब व नादुरुस्त असलेले विद्युत पोल अनेक दिवसांपासून पडून आहे. तसेच इतर साहित्यदेखील ठेवण्यात आल्याने या ठिकाणी सरपटणारे प्राणीदेखील वावरत असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे मनपाकडून नागरिकांना स्वच्छतेचे धडे दिले जात असले तरी दुसरीकडे मात्र मनपाचाच आवार हा भंगार बाजार झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. (वार्ताहर)
कार्यालय आवार बनले भंगाराचे गुदाम
By admin | Updated: April 9, 2017 00:17 IST
सिडको विभागीय कार्यालय इमारतीच्या मागील आवारात खराब झालेले विद्युत पोल व इतर नादुरुस्त असलेले साहित्य असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
कार्यालय आवार बनले भंगाराचे गुदाम
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}