शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

बीएपीएसची भव्य शोभायात्रा; स्वामीनारायणाच्या जयघोषाने दुमदुमली कुंभनगरी, CM शिंदेंच्या उपस्थितीत आज प्राणप्रतिष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 10:57 IST

नगर शोभायात्रेची सुरवात गोल्फ क्लब मैदानावरून पूज्य साधू श्रृतीप्रकाश दास यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ संतांच्या हस्ते स्वामीनारायणाची आरती व श्री अक्षर पुरषोत्तम महाराज यांच्या नामस्मरणानंतर करण्यात आली.

राजू ठाकरे -नाशिक- बीएपीएस स्वामिनारायण मंदिरातील मूर्तीप्रतिष्ठा महोत्सवांतर्गत मंगळवारी नाशिक शहरातून भव्य नगर शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेत देशाच्या विविध भागातून आलेल्या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह वेगवेगळ्या महापुरुषांची वेशभूषा करून सहभाग घेतला. शोभायात्रेत भारताच्या विविधतेत एकतेचे दर्शन घडविणाऱ्या चलचित्ररथांसह जेष्ठ साधू संत, मंहत व हरिभक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. यावेळी काही कलावंतानी मानवी मनोरे तयार करून भारतीय लोककलेचे दर्शन घडवले. भव्यनगर शोभायात्रेत सहभागी हरीभक्तांनी केलेल्या स्वामीनारायणाच्या जयघोषाने नाशिक नगरी दुमदुमली होती.

नगर शोभायात्रेची सुरवात गोल्फ क्लब मैदानावरून पूज्य साधू श्रृतीप्रकाश दास यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ संतांच्या हस्ते स्वामीनारायणाची आरती व श्री अक्षर पुरषोत्तम महाराज यांच्या नामस्मरणानंतर करण्यात आली. यावेळी, पूज्य साधू भक्तीप्रिय दास, पूज्य साधू यज्ञेश्वर दास, पूज्य साधू प्रेमप्रकाश दास, पूज्य साधू घनश्याम दास, पूज्य साधू नारायणभूषण दास, पूज्य साधू क्रिष्णवल्लभ दास, पूज्य साधू क्रिष्णप्रिय स्वामी, भाजप शहाराध्यक्ष गिरीष पालवे, विपुल मेहता, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, सुनील रोहकले आदी मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगेही सोडण्यात आले आणि मग शोबायात्रेला सुरुवात झाली.

सहभागी बारा चित्ररथांनी वेधले लक्ष..- नगर शोभायात्रेत सहभागी अक्षर पुरषोत्तम महाराज यांच्या पालखीसह श्री गुणातीत गुरूपरंपरा,  लक्ष्मी नारायण देव, विठ्ठल रखुमाई,  गणेश भगवान,  हमुमान , शिव पार्वती, सिंह रथ, मयुर रथ, गज रथ व अश्व रथ अशा बारा वेगवेगळ्या चित्ररथांनी नाशिककरांचे वेधले लक्ष.- पाचशेहून अधिक महिलांनी यावेळी मंगल कलशयात्रेत सहभाग घेतला तर अनेक महिलांनी स्वामीनारायण देवाचे वचनामृत ग्रंथ घेतले डोक्यावर. - सर्जा राजाची बैलजोडी, देवदेवतांच्या वेषातील लहान बालके, आदिवासी नृत्याचा कलाविष्कार, विविध राज्यांतील वेशभूषा, भारत माता वेशभूषेतील भक्त यांसह शिस्तबद्ध निघालेल्या महिला - पुरूषांच्या मोटरसायकल रेलीने विविधतेत एकतेचे घडविले दर्शन.- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे व प्रकट ब्रह्मस्वरूप महंतस्वामी महाराज यांच्या उपस्थितीत आज बुधवार (दि.28) बीएपीएस स्वामिनारायण मंदिरात वेदोक्त मूर्तीप्रतिष्ठाविधी होणार असून नाशकातील हरीभक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन साधू भक्तिप्रियदास ( कोठारी स्वामी) व साधू अभयस्वरूपदास, साधू महाव्रतदास, तीर्थस्वरूप स्वामी आदींनी केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकEknath Shindeएकनाथ शिंदेTempleमंदिर