शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चारा वाहतुकीवर बंदी

By admin | Updated: September 23, 2015 23:18 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : महिनाभराचा साठा उपलब्ध

नाशिक : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कमी अधिक प्रमाणात हजेरी लावणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी, जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून नाशिक जिल्ह्यातील चारा अन्य जिल्ह्यात वा परराज्यात वाहतुकीस जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील आदेश सर्व तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, चारा उत्पादक व विक्रेत्यांना वैयक्तिकरीत्या नोटीस बजावणे शक्य नसल्याने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरवर्षी सप्टेंबरपर्यंत समाधानकारक कोसळणाऱ्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न सुटत असे, यंदा मात्र जिल्ह्णात पावसाने अडीच महिन्यांपासून दडी मारल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जसा आ वासून उभा होता तशीच आता जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात गेल्या आठवड्यातील पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली, परंतु जो काही पाऊस झाला आहे, त्यातून जनावरांच्या चाऱ्यासाठी हातभार लागण्याची शक्यता नाही. खरिपाची पिकेही हातची गेल्याने त्यातूनही चारा मिळणे अवघड होऊन बसले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडे जो काही साठवलेला सुका चारा असेल किंवा वन खात्याच्या कुरणांमध्ये हिरवा चारा असेल त्याच्या विक्रीस व वाहतुकीस बंदी घालण्याचे ठरविण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्णात आॅक्टोबर अखेरपर्यंत चारा पुरेल अशी परिस्थिती आहे. त्यात वन खात्याकडूनही माहिती मागविण्यात आली असून, त्यातून खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी, जिल्हाधिकाऱ्यांनी काल या संदर्भात आदेश काढून जिल्ह्णातील चारा परजिल्ह्णात वा परराज्यात वाहतुकीस बंदी घातली आहे व त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश तहसीलदार, प्रांत अधिकाऱ्यांना दिले आहेत. २० नोव्हेंबरपर्यंत ही बंदी घालण्यात आली असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८६० चे कलम १८८ व मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.