शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

निर्यातबंदीने बळीराजा संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 1:35 AM

केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्ह्यात लासलगाव, सटाणा, उमराणेसह ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकºयांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखून धरली. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हा मुद्दा मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित करणार असल्याचे सांगितले. तर कृषीमंत्री दादा भुसे यांनीही या निर्यातबंदीस विरोध दर्शविला. खासदारांनीही केंद्र सरकारला निर्णय रद्द करण्यासाठी साकडे घातले आहे.

ठळक मुद्देकांदा दरात घसरण : जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको; ठिय्या आंदोलन

नाशिक : केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्ह्यात लासलगाव, सटाणा, उमराणेसह ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकºयांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखून धरली. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हा मुद्दा मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित करणार असल्याचे सांगितले. तर कृषीमंत्री दादा भुसे यांनीही या निर्यातबंदीस विरोध दर्शविला. खासदारांनीही केंद्र सरकारला निर्णय रद्द करण्यासाठी साकडे घातले आहे.सटाणा येथील कृषी उत्पन्न समितीच्या गेटसमोर शेतकºयांनी निर्यातबंदी उठवावी याबाबत घोषणाबाजी करत आंदोलन छेडले. लासलगाव येथे संतप्त कांदा उत्पादकांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वाराबाहेर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. विक्रीसाठी कांदा घेऊन आलेल्या वाहनातील लिलाव सुरू झाल्यानंतर सुरुवातीला पहिला कांदा लिलाव १९०० रुपये बाजारभावाने विक्री झाल्याने संतप्त कांदा उत्पादकांनी पाच मिनिटांत लिलावप्रक्रिया बंदपाडली. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण झालेली दिसून आली.नाशिक जिल्ह्यात लासलगाव बाजार समितीत सकाळी केवळ तीन ट्रॅक्टर कांद्याचा लिलाव झाला. क्विंटलचे दर १,२८० ते २२०० रूपयांपर्यंत घसरल्याने शेतकºयांनी लिलाव बंद पाडले. त्यानंतर लिलाव झाले नाही. पिंपळगाव बाजार समितीत २१ हजार क्विंटल आवक झाली. सरासरी भाव २,३१५ जास्तीत जास्त २,९००, तर कमीतकमी १५०० जाहीर झाला. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी पिंपळगाव बाजार समितीत १,०९० रूपयांची घसरण झाली. त्यामुळे दुपारी शेतकºयांनीकांदा लिलाव बंद पाडले. अधिकाºयांच्या मध्यस्थीने बाजारभाव ३,४०० रुपये पुकारण्यात आले. त्यानंतर लिलाव झाले. सरासरी भाव २,९०० रुपये जाहीर झाला होता.

टॅग्स :NashikनाशिकonionकांदाagitationआंदोलनNCPराष्ट्रवादी काँग्रेस