शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

धामणगाव-टाकेद रस्त्याची दुरावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 18:31 IST

नांदूरवैद्य : महाराष्ट्रात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी टाकेद सर्वतीर्थ ते धामणगांव हा अतिशय महत्त्वाच्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावरून चालतांना नागरिकांची दमछाक होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून सदर रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांसह भाविकांनी केली आहे.

ठळक मुद्देकाँक्रिटीकरण करण्याची नागरिकांची मागणी

नांदूरवैद्य : महाराष्ट्रात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी टाकेद सर्वतीर्थ ते धामणगांव हा अतिशय महत्त्वाच्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावरून चालतांना नागरिकांची दमछाक होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून सदर रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांसह भाविकांनी केली आहे.इगतपुरी तालुक्यातील सर्वपरिचित असलेल्या तसेच रामायण काळातील घटनेतील साक्ष असलेल्या सर्वतीर्थ टाकेद ते धामणगांव या रस्त्याचे २०१४-१५ या वर्षामध्ये सिंहस्थ कुंभमेळाच्या काळात रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यात आलेले होते. सर्वतीर्थ टाकेद या तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने महाराष्ट्रातून येणारे हजारो भाविक याच रस्त्याचा वापर करत असतात.या रस्त्याने भाविकांची तसेच नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. सदर रस्ता अनेक आदिवासी गावांना जोडणारा असून दळवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. कुंभमेळ्याच्या वेळी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु त्यानंतर या रस्त्यावर अनेक छोटे-मोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरील एकही खड्डा बुजविण्याचे कष्ट संबंधित विभागाने घेतलेले नाहीत. या रस्त्याने भरवीर बुद्रुक, अडसरे खुर्द, अडसरे बुद्रुक, म्हैसवळण मार्गे राजुर अकोला, टाकेद, वासाळीकडे असंख्य नागरिक व पर्यटक भंडारदऱ्याकडे जात असतात, परंतु हा रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात अडकल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तेथील रस्त्यावर नेहमीच खड्डे पडून या रस्त्याची दयनीय अवस्था होत असते. यासाठी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून या रस्त्याचे कायमस्वरूपी मजबूत काँक्रिटीकरण करावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.सदर रस्ता हा अतिशय महत्त्वाचा व रहदारीचा असल्यामुळे या रस्त्याने अनेक कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, कंपनी कामगार, सिन्नर, नाशिक, मुंबई, इगतपुरी आदी ठिकाणी रोजगाराच्या निमित्ताने ये-जा करत असतात. तरी लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देवून या रस्त्याची दखल घेत हा रस्ता आदिवासी उपाय योजनेअंतर्गत, जिल्हा परिषदेमार्फत अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अतिशय दर्जात्मक कॉंक्रीटिकरण करण्यात यावे अशी मागणी धामणगावचे सरपंच शिवाजी गाढवे, टाकेदच्या सरपंच ताराबाई बांबळे, अडसरेचे सरपंच संतू साबळे, ज्ञानेश्वर मोंढे, मायदराचे सरपंच साहेबराव बांबळे, बाळासाहेब गाढवे, पांडुरंग गाढवे, भाऊसाहेब गाढवे, दौलत बांबळे, संतोष साबळे, संपत मोंढे, नंदू गाढवे, राजाराम गाढवे, नामदेव घुमरे, निवृत्ती जाधव, संतोष जाधव, सागर गाढवे, वसंत गाढवे, रमेश गाढवे, अशोक गाढवे आदींनी केली आहे.

सदर रस्ता सन २०१४-१५ ला कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर बनविल्यानंतर आजपर्यंत या रस्त्याची कुठलीही डागडुजी झालेली नाही. टाकेद तीर्थक्षेत्री भाविक येत असतात. हा रस्ता पर्यटन, शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी दहा ते पंधरा गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून भविष्यात हा रस्ता मजबूत करायचा असेल तर या रस्त्याचे काँक्रिटीकरणच होणे गरजेचे आहे.- समाधान वारुंगसे उपाध्यक्ष, युवासेना इगतपुरी तालुका.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाStrikeसंप