शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

मनपाच्या उदासीनतेमुळे चिमुकल्या अजीमचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 1:05 AM

महापालिकेच्या भुयारी गटारीच्या उघड्या चेंबरबाबतीत अनेकदा ओरड केली जाते. मात्र जोपर्यंत अपघात घडत नाही तोपर्यंत असे चेंबर विभागाकडून बंदिस्त केले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वडाळागावातील सादिकनगर भागात अशाच एका चेंबरमध्ये पडून सात वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नाशिक : महापालिकेच्या भुयारी गटारीच्या उघड्या चेंबरबाबतीत अनेकदा ओरड केली जाते. मात्र जोपर्यंत अपघात घडत नाही तोपर्यंत असे चेंबर विभागाकडून बंदिस्त केले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वडाळागावातील सादिकनगर भागात अशाच एका चेंबरमध्ये पडून सात वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या चिमुकल्याच्या मृत्यूला नेमके कोण जबाबदार? असा प्रश्न येथील संतप्त रहिवाशांनी उपस्थित केला असून, अजीम हा लहानगा प्रशासकीय उदासीनतेचा बळी ठरल्याची भावना व्यक्त केली आहे.भूमिगत गटारींच्या चेंबरमध्ये पडून मजुरापासून प्राण्यांपर्यंत मृत्यूच्या अनेकदा घटना घडल्या आहेत. याबाबत मनपा प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत. महेबूबनगर, सादिकनगर, साठेनगर हा स्लम परिसर आहे. या भागात बहुतांश चेंबरवरील ढापे गायब झाले असून, चेंबर बंदिस्त करण्याची मागणी केली जाते, मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशाप्रकारच्या दुर्दैवी घटना घडत असल्याचे येथील रहिवासी लाला शहा, इरफान शेख, युनूस खान, फिरोज फारूखी, जबेर खान आदींनी सांगितले.नुकसानभरपाईची मागणीचिमुकल्या अजीमचा चेंबरच्या ढाप्यात पडून मृत्यू झाला. यास मनपाचा गलथान कारभार जबाबदार आहे. अजीमचे कुटुंब अत्यंत गरीब असून, वडील फळविक्रेता आहे. अजीम अभ्यासात हुशार असल्याने सादिकनगरमध्ये तो सर्वांचाच लाडका होता. त्याच्या अचानकपणे जाण्याने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. तसेच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या कुटुंबाला महापालिका प्रशासनाने नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.‘त्या’ दोघींचे प्रसंगावधान पण...मनपाच्या उर्दू शाळेत इयत्ता दुसरीत शिकणारा अजीम जुबेर खान (७) हा चिमुकला साधारणत: आठवडाभरापूर्वी सादिकनगरमधील एका गल्लीत असलेल्या उघड्या चेंबरमध्ये पडला. यावेळी अजीम जोरात ओरडला. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सुरैया शेख, जकिया शेख या महिलांनी तत्काळ चेंबरच्या दिशेने धाव घेतली. दोघींनी क्षणाचाही विलंब न लावता अजीमला कसेबसे बाहेर काढले. तोपर्यंत स्थानिक नागरिकांची चेंबरभोवती मोठी गर्दी जमली होती. चिमुकल्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी (दि.२८) त्याची प्राणज्योत मालवली.

टॅग्स :AccidentअपघातNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाDeathमृत्यू