आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 01:53 IST2021-12-31T01:53:11+5:302021-12-31T01:53:37+5:30

हिरावाडीतील कमलनगर येथे असलेल्या सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या मूळ बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका तरुणीने बुधवारी (दि.२९) मध्यरात्रीच्या सुमारास गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. वसतिगृहातील खोलीत तिने पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. श्रुती सुरेश सानप (२२) असे मयत झालेल्या विद्यार्थिनीचे नाव असून तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

Ayurveda college student choked | आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने घेतला गळफास

आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने घेतला गळफास

ठळक मुद्देवसतिगृहात आढळला मृतदेह : माता-पित्यांच्या भेटीनंतर संपविले जीवन

पंचवटी : हिरावाडीतील कमलनगर येथे असलेल्या सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या मूळ बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका तरुणीने बुधवारी (दि.२९) मध्यरात्रीच्या सुमारास गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. वसतिगृहातील खोलीत तिने पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. श्रुती सुरेश सानप (२२) असे मयत झालेल्या विद्यार्थिनीचे नाव असून तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी दोन दिवसांपूर्वीच श्रुती आपल्या मूळ गावी बीड जिल्ह्यात आई-वडिलांना भेटून महाविद्यालयात परतली होती. तिने महाविद्यालयाला लागून असलेल्या वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. श्रुती सानप हिरावाडीतील सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेत होती. काल मध्यरात्री ती फोन उचलत नसल्याने तिच्या ओळखीच्या एका युवकाने श्रुतीच्या मैत्रिणीला फोन करून श्रुती फोन उचलत नसल्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर मैत्रिणींनी ही बाब वसतिगृहाच्या संबंधितांना कळविली. त्यानंतर श्रुती राहत असलेल्या खोलीचा दरवाजा वाजविला असता आतमधून बऱ्याच वेळेनंतरही कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केल्यानंतर श्रुती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला.

आत्महत्येप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Ayurveda college student choked