शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण खाते फटाक्यांच्या दुष्परिणामांची जागृती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2016 23:17 IST

वरातीमागून घोडे : आॅक्टोबरच्या आदेशाची जानेवारीत अंमलबजावणी

नाशिक : दिवाळीत फटाक्यांचे होणारे दुष्परिणाम म्हणून सर्वोच्च न्यायालयाने शाळांमध्ये तातडीने जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश गेल्यावर्षी दिवाळीपूर्वी दिले खरे; मात्र दिवाळी झाल्यानंतर आता राज्य शासनाने गेल्या आठवड्यात परिपत्रक काढले असून, शाळांनी काय करावे याचे निर्देश दिल्याने वरातीमागून घोडे असा प्रकार घडला आहे. शासनाचा हा संथगती कारभार की पुढील दिवाळीसाठी ही आगाऊ दक्षता, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.दिवाळीत वाजणाऱ्या फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. त्याविषयी पर्यावरणप्रेमी ओरड करीत असतात. अशाच प्रकारे प्रदूषणाबाबत जागरूक असलेल्या अर्जुन गोपाल आणि अन्य काही पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर्षी याचिका दाखल केली होती. त्या आधारे सर्वाेच्च न्यायालयाने गेल्या वर्षी १६ आॅक्टोबर रोजी केंद्र शासनाने सर्व राज्य शासनांना फटाक्यांच्या अपायकारकतेविषयी जनजागृती करण्याचे आदेश दिले होते. शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये अध्यापकांमार्फत जागृती करण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे गेल्यावर्षी ७ ते १३ नोव्हेंबर दरम्यान दिवाळी होती. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाला जानेवारी महिना उजाडावा लागला आहे. राज्य शासनाने २२ जानेवारी रोजी परिपत्रक जारी केले असून, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने सर्व शाळांमध्ये फटाक्यांबाबत जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत.