शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

ऑस्ट्रेलियन कंपनी करणार नाशिकमध्ये गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 11:06 IST

ऑस्ट्रेलिया  येथील ‘अर्बन वॉटर फाउंटन’ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अंबड येथील ‘अनुप्रिया अल्ट्राटेक’ कंपनीबरोबर गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले

ठळक मुद्दे‘अनुप्रिया अल्ट्राटेक’ कंपनीबरोबर गुंतवणूक करण्याचे आश्वासनदोन महिन्यापासून गुंतवणुकीबाबत पाठपुरावा केला होताशुद्ध पाणी देणारे उत्पादन सार्वजनिक सोसायटयांमध्ये, उद्यानात, जॉगिंगपार्क भागात बसविता येऊ शकते

नाशिक :- नाशिक भेटीवर आलेल्या ऑस्ट्रेलिया  येथील ‘अर्बन वॉटर फाउंटन’ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अंबड येथील ‘अनुप्रिया अल्ट्राटेक’ कंपनीबरोबर गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले.        ऑस्ट्रेलिया येथील ‘अर्बन वॉटर फाउंटन’ कंपनीबरोबर गेल्या दोन महिन्यापासून गुंतवणुकीबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार अर्बन वॉटर फाउंटनचे व्यवस्थापकीय संचालक गॅरी अलन आणि संचालक सायमन हिंगीस नाशिक भेटीवर आले असता त्यांनी अंबड येथील ‘अनुप्रिया अल्ट्राटेक’ कंपनीला भेट दिली. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राकेश पाटील, राम पाटील, राजेंद्र अहिरे यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे कंपनीची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर आयोजित कार्यक्र मात खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, महापौर सतीश कुलकर्णी यांनी या परदेशी गुंतवणूकदारांचे स्वागत करु न भारत सरकारतर्फे सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान आॅस्ट्रेलियन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांची भेट घेऊन ऑस्ट्रेलियन उत्पादनाचे नाशिकमध्येही उत्पादन करून हे शुद्ध पाणी देणारे उत्पादन सार्वजनिक सोसायटयांमध्ये, उद्यानात, जॉगिंगपार्क, रेल्वे स्टेशन, बसस्टेशन, ग्रामीण व आदिवासी भागात बसविता येऊ शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्यामुळे होणारे आजार टाळता येतील. तसेच हे पर्यावरणाला पूरक असे उत्पादन असल्याची माहिती दिली. तसेच भविष्यात या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होऊ शकते. त्यामुळे नवीन व्हेंडर बेस तयार होईल व नवीन रोजगार देखील निर्माण होऊ शकतो.असाही विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे, महावितरणचे मुख्य अभियंता ब्रीजलाल जनवीर आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकAustraliaआॅस्ट्रेलियाMIDCएमआयडीसीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय