नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांना औरंगाबादच्या संशयितांची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 20:50 IST2018-02-28T20:50:38+5:302018-02-28T20:50:38+5:30
नाशिक : गडकरी चौकातील विभागीय सहनिबंधक कार्यालयात पदोन्नती व पदस्थापना केलेल्या कर्मचाºयांबाबत बोलून गोंधळ घालणाºया औरंगाबादच्या दोघा संशयितांविरोधात मुंबईनाका पोलिसांनी सरकारी कामात अडथळा व धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ वाय़ यू़ देवकर व सदाफुले अशी या दोघा संशयितांची नावे आहेत़

नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांना औरंगाबादच्या संशयितांची धमकी
नाशिक : गडकरी चौकातील विभागीय सहनिबंधक कार्यालयात पदोन्नती व पदस्थापना केलेल्या कर्मचाºयांबाबत बोलून गोंधळ घालणाºया औरंगाबादच्या दोघा संशयितांविरोधात मुंबईनाका पोलिसांनी सरकारी कामात अडथळा व धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ वाय़ यू़ देवकर व सदाफुले अशी या दोघा संशयितांची नावे आहेत़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि़ २७) दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास विभागीय सहनिबंधक मिलिंद दशरथ भालेराव (रा. पौर्णिमा बस स्टॉप, द्वारका, नाशिक) हे आपल्या गडकरी चौकातील कार्यालयात काम करीत होते़ त्यावेळी संशयित वाय. यू. देवकर व त्यांचा जोडीदार सदाफुले (पूर्ण नावे व पत्ते माहीत नाहीत, सध्या रा. औरंगाबाद) यांनी भालेराव यांच्या दालनाबाहेरील शिपायास धक्काबुक्की केली़ त्यानंतर जोरजोराने दरवाजा ढकलून भालेराव यांच्या दालनात प्रवेश केला़ तसेच पदोन्नती व पदस्थापना केलेल्या कर्मचाºयांबाबत जोरजोरात बोलून आमच्या म्हणण्याप्रमाणे काम करा असा दबाव टाकला व तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली़
या प्रकरणी भालेराव यांनी या दोघा संशयितांविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़