जिल्ह्यातील शाळांचे लवकरच लेखापरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:00 IST2019-12-14T23:13:00+5:302019-12-15T01:00:23+5:30
मुख्याध्यापक संघाच्या मदतीने जिल्ह्यातील १०० टक्के माध्यमिक शाळांचे लेखापरीक्षण लवकरच करण्यात येणार असल्याची ग्वाही लेखाधिकारी संजय खडसे यांनी मुख्याध्यापक संघाला दिली.

नाशिक येथे मुख्याध्यापक संघ बैठकीप्रसंगी लेखाधिकारी संजय खडसे, शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव. समवेत एस.के. सावंत, एस.बी. शिरसाठ, सुरेश शेलार, राजेंद्र सावंत, बी.के. शेवाळे, भरत गांगुर्डे आदी.
सिन्नर : मुख्याध्यापक संघाच्या मदतीने जिल्ह्यातील १०० टक्के माध्यमिक शाळांचे लेखापरीक्षण लवकरच करण्यात येणार असल्याची ग्वाही लेखाधिकारी संजय खडसे यांनी मुख्याध्यापक संघाला दिली.
शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांनी प्रस्ताव प्रलंबित राहणार नसल्याचे सांगितले. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व लेखाधिकारी कार्यालय नाशिक यांची संयुक्त सहविचार सभा संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सचिव एस.बी. देशमुख यांनी प्रास्ताविकातून मुख्याध्यापक संघाकडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आलेल्या तक्रारींचा पाढा वाचला व या बैठकीचा उद्देश स्पष्ट केला, तर कार्याध्यक्ष एस.बी. शिरसाठ, मार्गदर्शक सुरेश शेलार, उपाध्यक्ष राजेंद्र सावंत, बी. के. शेवाळे, परवेझा शेख, भरत गांगुर्डे, बाबासाहेब खरोटे, देवेंद्र ठाकरे, कैलास वाघ, डी.टी. निंबेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.
जिल्ह्यातून मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कार्यालयाबाबत आलेल्या तक्रारींचे निराकरण लेखाधिकारी खडसे यांनी केले. वरिष्ठ, निवड श्रेणीचे प्रस्ताव, वेतननिश्चितीचा एकही प्रस्ताव प्रलंबित राहणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी दिंडोरीचे मुख्याध्यापक ए.डी. काळे व मोहिनी भगरे, एन.एस. विघ्ने यांची प्रकरणे त्वरित मार्गी लावण्यात येणार
असून, कार्यालयात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नसल्याची ग्वाही खडसे यांनी दिली. शिक्षण उपसंचालक बच्छाव यांनी शिक्षकांना १०, २० व ३०चा टप्पा देण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीचा
निर्णय लवकरच सकारात्मक येईल याचा पाठपुरावा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ राज्य पातळीवर करत आहे. यावेळी शरद गिते, मनोज वाकचौरे,
ए.डी. काळे, आर.एस. गायकवाड, के. एस.आहेर, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.