शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

बाजार समित्यांमध्ये लिलाव ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:37 PM

लासलगाव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांनी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला. त्यामुळे बाजार समित्यांमधील लिलाव बंद झाल्याने कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले.

ठळक मुद्देमाथाडी कामगारांचा लाक्षणिक बंद : प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कलासलगाव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांनी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला. त्यामुळे बाजार समित्यांमधील लिलाव बंद झाल्याने कोट्यवधींचे व्यवहार ठप्पझाले.प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने आक्रमक भूमिका घेतली आहे. १८ समस्यांचे निवेदन शासनाला दिले आहे.कामगारांच्या समस्यांविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील व कार्याध्यक्ष माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत संपाची भूमिका स्पष्ट केली आहे. माथाडींचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. माथाडी बोर्डावर पूर्णवेळ अध्यक्ष नाहीत. कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. वर्षानुवर्षे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सर्व प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही काहीच होत नसल्याने आंदोलन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.शशिकांत शिंदे यांनीही प्रशासकीय स्तरावर माथाडी कायदा संपविण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचे स्पष्ट केले. कामगारांच्या अस्तित्वाला धक्का लागणार असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. कामगारांच्या हितासाठी आंदोलन करावे लागले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नाशिक ही देशातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. एकट्या लासलगाव बाजार समितीत दिवसाला कांद्याची सुमारे २२ हजार क्विंटल आवक होते, तर पिंपळगाव, नाशिक, दिंडोरी, कळवण विविध बाजार समित्यांमध्ये प्रतिदिन एकूण दोन लाख हजार क्विंटल कांदा आवक होते. ते सर्व व्यवहार ठप्प झाले होते. शासनाकडे आणि संबंधितांकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व बाजार समित्या बंद होत्या.माथाडी संघटनेने १८ प्रमुख मागण्यांचे निवेदन शासनाला दिले आहे. हे सर्व प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत. प्रश्न न सोडविल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. संपकरी माथाडी कामगार संघटनेच्या बोर्डातील एएसटीआय कंपनीच्या संगणक प्रणालीद्वारे देण्यात येणारी सेवा खंडित केल्याविषयी निर्णय व्हावा, माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करणे, समितीवर युनियनच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करणे, विविध माथाडी बोर्डांची पुनर्रचना करणे व युनियनच्या सदस्यसंख्येच्या प्रमाणात सदस्यांची नेमणूक करणे, माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे, मंडळामध्ये अध्यक्ष व सचिवांच्या नेमणुका करणे आदी मागण्यांचा समावेश आहे. माथाडी पतसंस्थांमधून कर्जाचे हप्ते कपात न करण्याच्या निर्णय रद्द होणे, कळंबोली स्टील मार्केटमध्ये सुविधा उपलब्ध करून देणे, फॅक्टरीमध्ये माथाडी कायदा व मंडळाच्या योजनेची अंमलबजावणी करणे, विविध रेल्वे यार्डात माथाडी कामगारांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, माथाडी कायदा व मंडळाच्या योजनेतील त्रुटी दूर करणे, माथाडी हॉस्पिटलच्या चौकशीचे गुºहाळ थांबवून रुग्णालय सुरळीत सुरू करण्यास सहकार्य करावे, कोल्हापूर माथाडी मंडळातील कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात निर्णय घेणे, पुणे येथील कामगारांचे प्रश्न सोडविणे, माथाडी कायद्यात पोलीस संरक्षणाची तरतूद करणे, गुंड प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी समिती गठीत करणे, नाशिक येथील माथाडी बोर्डातील कामगारांच्या लेव्हीच्या प्रश्नांची सोडवणूक करणे, बाजार समितीच्या मापाडी व तोलणार कर्मचाºयांना बाजार समितीच्या सेवेत सामावून घेणे, वडाळा येथील माथाडी कामगारांच्या घरकुलातील अडचणी दूर करणे आदी मागण्या आहेत.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी