सरकारचे अपयश झाकण्यासाठी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न ; आम अदमी पार्टीचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 15:53 IST2018-10-20T15:44:17+5:302018-10-20T15:53:22+5:30
देशासमोर आर्थिक संकटासोबतच बेरोजगारी,शिक्षण आणि आरोग्याच्या अनेक समस्या असताना विकासाची स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारला विविध पातळयांवर काम करताना सपशेल अपयश आले आहे. हे अपयश झाकण्यासाठीच सकारकडून विविध समाजांमध्ये तेढ निर्माण करून फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र सचीव अॅड. प्रभाकर वायचळे व नाशिक शहराध्यक्ष अॅड. बंडू दशरथ डांगे यांनी शनिवारी (दि. २०) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे.

सरकारचे अपयश झाकण्यासाठी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न ; आम अदमी पार्टीचा आरोप
नाशिक : देशासमोर आर्थिक संकटासोबतच बेरोजगारी,शिक्षण आणि आरोग्याच्या अनेक समस्या असताना विकासाची स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारला विविध पातळयांवर काम करताना सपशेल अपयश आले आहे. हे अपयश झाकण्यासाठीच सकारकडून विविध समाजांमध्ये तेढ निर्माण करून फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र सचीव अॅड. प्रभाकर वायचळे व नाशिक शहराध्यक्ष अॅड. बंडू दशरथ डांगे यांनी शनिवारी (दि. २०) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे.
भाजपा सरकारने नोटबंदी, जीएसटी, खासगीकरण, नोकरभरती बंद करून शिक्षणाचे बाजारीकरण करण्यासोबतच शेतकऱ्यांच्या जमीनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचे काम केले आहे. परंतु,निवडणुकांपूर्वी देशवासीयांना दाखवलेली स्वप्न पूर्ण करण्यात मात्र सरकारला सपशेल अपयश आल्याने आता सरकार माणसामाणसामध्ये भेद निर्माण करून इंग्रजांप्रमाणे फोडा आणि राज्य करा अशी रणनिती सरकारकरून वापरली जात असल्याचा आरोप करतानाच हा डाव हाणून पाडण्यासाठी तसेच देशासह महाराष्ट्रातील शिवसेना भाजपाचे सरकार हटविण्यासाठी शहरातून बुधवारी (दि.२४)आॅक्टोबरला ‘जनआक्रोश’ मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आम आदमी पार्टीचे नशिक कार्यकारणीने पत्रकार परीषदेतून स्पष्ट केले. यावेळी शहर उपाध्यक्ष जगमेरसिंग खालसा,विकास पाटील, अनील कौशिक, अलताफ शेख, स्वप्नील घिया रवी ननावरे आदी उपस्थित होते.