ओझर येथे अल्पवयीन मुलीचा अपहरणाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 00:52 IST2021-02-26T23:14:21+5:302021-02-27T00:52:56+5:30

ओझर टाऊनशिप येथील मिलिंदनगरमधील मजुरी करणाऱ्या महिलेची सातवर्षीय मुलगी गुरुवारी (दि.२५) रात्री दीडच्या सुमारास जवळच राहणाऱ्या चोवीस वर्षीय युवकाने झोपेत असताना पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर आईने बाहेर येऊन अपहरण करणाऱ्यास दगड मारल्याने अपहरणाचा प्रयत्न फसला.

Attempted abduction of a minor girl at Ozark | ओझर येथे अल्पवयीन मुलीचा अपहरणाचा प्रयत्न

ओझर येथे अल्पवयीन मुलीचा अपहरणाचा प्रयत्न

ठळक मुद्देगुन्हा दाखल : मुलीच्या आईचे प्रसंगावधान

ओझर टाऊनशिप : येथील मिलिंदनगरमधील मजुरी करणाऱ्या महिलेची सातवर्षीय मुलगी गुरुवारी (दि.२५) रात्री दीडच्या सुमारास जवळच राहणाऱ्या चोवीस वर्षीय युवकाने झोपेत असताना पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर आईने बाहेर येऊन अपहरण करणाऱ्यास दगड मारल्याने अपहरणाचा प्रयत्न फसला. मिलिंदनगरमध्ये सदर मजुरी काम करणारी महिला तिची सात वर्षांची मुलगी, तसेच पती व दोन मुलांसह राहते. तिची मुलगी घरात झोपलेली असताना दरवाजा अर्धवट उघडा असल्याने अनिल धर्मा सकट (वय २४), रा. राजवाडा, मिलिंदनगर, ओझर याने घरात प्रवेश केला. मुलीला उचलून घेऊन पळून जात असताना मुलीने आरडाओरड केली. त्यामुळे तिच्या आईला जाग आली व तिने घराबाहेर धाव घेतली असता आपल्या मुलीस कुणी तरी पळवून नेत असल्याचे तिने पाहिले. तिने अनिल सकट याच्या बाजूने दगड मारल्याने त्याने मुलीस खाली टाकून देत अंधारात पळ काढला. याबाबत ओझर पोलिसांत मुलीच्या आईने तक्रार दिली असून पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अनिल धर्मा सकट याच्या विरोधात भादंवि कलम ३६३, ४५२, ७११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोक राहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणपतराव एन. जाधव, पोलीस उपनिरीक्षक ए.बी. तोडमल अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Attempted abduction of a minor girl at Ozark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.