पतंग उडविताना वादातून युवकावर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 02:50 IST2022-01-15T02:50:32+5:302022-01-15T02:50:53+5:30

उत्तमनगर परिसरात एका घराच्या छतावर पतंग उडविताना आपआपसात झालेल्या वादातून एका धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने २६ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तरुणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

An attack on a youth while flying a kite | पतंग उडविताना वादातून युवकावर वार

पतंग उडविताना वादातून युवकावर वार

सिडको : उत्तमनगर परिसरात एका घराच्या छतावर पतंग उडविताना आपआपसात झालेल्या वादातून एका धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने २६ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तरुणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी युवकाचे नाव चेतन शिंदे (२६, रा. एकता चौक, सिडको) असे आहे. मकरसंक्रांतीनिमित्त सिडको भागात इमारत तसेच सिडकोतील एका घराच्या छतावर युवक पतंग उडवत होते. याचवेळी उत्तमनगर परिसरात शुक्रवारी (दि.१४) दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका घराच्या छतावर पतंग उडवितांना दोन तरुणांमध्ये आपआपसात वाद झाले. या वादातून चेतन शिंदे याच्यावर दुसऱ्या एका तरुणांने धारदार वस्ता-याने वार केले. त्यामुळे चेतन शिंदे गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान या प्रकरणाची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: An attack on a youth while flying a kite