एमजीरोड भागात एकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:18 IST2021-04-10T01:17:58+5:302021-04-10T01:18:46+5:30

एमजी रोड परिसरातील वकीलवाडी या वर्दळीच्या ठिकाणी चारचाकी ४आणि दुचाकीवरून आलेल्या वादात टोळक्याने लौकिक लुले याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.

Attack on one in MG Road area | एमजीरोड भागात एकावर हल्ला

एमजीरोड भागात एकावर हल्ला

 नाशिक :  एमजी रोड परिसरातील वकीलवाडी या वर्दळीच्या ठिकाणी चारचाकी ४आणि दुचाकीवरून आलेल्या वादात टोळक्याने लौकिक लुले याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांनी गुरुवारी (दि. ८) रात्री ८ वाजेच्या सुमारास लाठ्याकाठ्यांसह चॉपरचा वापर करीत एकाला जखमी केले असून, याप्रकरणी स रकारवाडा पोलीस ठाण्यात चार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे. या प्रकरणी लौकिक प्रशांत लुले (२६) यांने हल्लेखोरांविरोधात फिर्याद दिली असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Attack on one in MG Road area