इगतपुरीच्या माजी उपसभापतींवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 13:21 IST2019-04-08T13:20:41+5:302019-04-08T13:21:47+5:30
घोटी : इगतपुरीचे माजी उपसभापती रमेश जाधव यांच्यावर रविवारी हल्ला करण्यात झाला. याबाबत घोटी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

इगतपुरीच्या माजी उपसभापतींवर हल्ला
घोटी : इगतपुरीचे माजी उपसभापती रमेश जाधव यांच्यावर रविवारी हल्ला करण्यात झाला. याबाबत घोटी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. फिर्यादीत नमूद केले आहे की, ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून गावातील साहेबराव भिकाजी जाधव, कैलास रामचंद्र जाधव, रामदास पांडू जाधव, दत्तू भिकाजी जाधव, संजय भिवाजी जाधव आदींसह कारमधील पाच ते सहा जणांनी माजी उपसभापती रमेश जाधव यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात आई चंद्रभागा जाधव हिलाही मार लागला आहे. जखमींवर घोटीच्या ग्रामीण रु ग्णालयात उपचार करण्यात आले. घोटी पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. जाधव यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सरपंचपदाची निवडणूक लढवली होती. यासह मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.