पालखेड येथे शेतकरी संघटनेच्या वतीने हल्लाबोल सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:18 IST2018-01-21T22:47:29+5:302018-01-22T00:18:38+5:30
ऊस सोडला तर एकाही पिकाला हमीभाव नसल्यामुळे शेतकºयांचे जीवन असुरक्षित झाले आहे. शेतकºयांना सुरक्षित करण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी नुसार हमीभाव घेणारच, असा निर्धार खासदार राजू शेट्टी यांनी केला. निफाड तालुक्यातील पालखेड येथे शेतकरी संघटनेच्या वतीने हल्लाबोल सभा घेण्यात आली. यावेळी खासदार राजु शेट्टी यांनी सरकारच्या धोरणामुळेच शेतकरी वर्गावर हल्लाबोल करण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.

पालखेड येथे शेतकरी संघटनेच्या वतीने हल्लाबोल सभा
पिंपळगाव बसवंत : ऊस सोडला तर एकाही पिकाला हमीभाव नसल्यामुळे शेतकºयांचे जीवन असुरक्षित झाले आहे. शेतकºयांना सुरक्षित करण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी नुसार हमीभाव घेणारच, असा निर्धार खासदार राजू शेट्टी यांनी केला. निफाड तालुक्यातील पालखेड येथे शेतकरी संघटनेच्या वतीने हल्लाबोल सभा घेण्यात आली. यावेळी खासदार राजु शेट्टी यांनी सरकारच्या धोरणामुळेच शेतकरी वर्गावर हल्लाबोल करण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. पालखेड येथे महाराष्ट्रातील सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारांच्या उपस्थितीत हल्लाबोल सभा घेण्यात आली. राजू शेट्टी यांचे भाषण ऐकण्यासाठी शेतकरी भर उन्हात बसून होते. सभेच्या सुरुवातीला रविकांत सुपकर, हंसराज वडघुले, रणजित बागल, दिलीप बनकर, बाबा शिंदे आदींची भाषणे झाली.
या सभेत खासदार राजू शेट्टी यांनी या शासनाच्या धोरणामुळेच शेतकरी वर्ग त्रासून गेला आहे. राज्यात केवळ ऊस वगळता अन्य कुठल्याही पिकाला हमीभाव नाही. ज्या व्यक्तीने तेरा वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविले अशी व्यक्ती आता शेतकºयांना फसवीत आहे. शेतीसाठी लागणाºया सर्व साहित्यावर जीएसटी लागतो मग आमच्या उत्पादनाला हमीभाव का देत नाही? केवळ २० टक्के शेतकरी पिकवणारे व ८० टक्के खाणारे असा विचार करून पिकवणाºयाचा विचार का करत नाही? पिकवणारे जोपर्यंत एक होत नाहीत तोपर्यन्त हे शासन वठणीवर येणार नाही. आपली एकजूट होत नसल्याचा फायदा हे सरकार घेत आहे, असेही शेट्टी म्हणाले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार हमीभाव घेतल्याशिवाय राहणार नाही. यापुढील काळात ही चळवळ संपूर्ण देशात उभी करावी लागणार आहे. भाजपाने अज्ञानातून फसवी आश्वासने दिली. आता शासनाला वठणीवर आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. यापुढे या शासनाच्या मंत्र्यांना गावात फिरकू देणार नाही. शासनाच्या मानगुटावर बसून सातबारा कोरा करणार. फसवून मते मिळविली असून, यापुढे आता हे चालणार नाही. सर्वात प्रगतिशील जिल्ह्यात आत्महत्या होत आहेत ही शोकांतिका असून, यापुढे पायातील हातात घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, अशी घणाघाती टीका यावेळी राजू शेट्टी यांनी केली.